Anganwadi Recruitment 2025 : महिला आणि बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीची प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत 18 हजार 882 पदे भरण्यात येत आहे. ज्या महसुली गावातील पदे रिक्त आहेत, त्या गावातील पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी लागणाऱ्या पात्रता अटी, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या बाबी खाली दिल्या आहेत.
Table of Contents
एकूण रिक्त पदे Anganwadi Recruitment 2025
भरती प्रकल्प: एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS)
- अंगणवाडी सेविका: 5,639
- अंगणवाडी मदतनीस: 13,243
- अर्जाची अंतिम तारीख: 31 मार्च 2025
- भरती ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (त्या-त्या जिल्हा, तालुका निहाय)
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
- किमान 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ किंवा समकक्ष)
- अर्जासोबत गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य
- पदवी, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., MS-CIT किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक
- गुणांकनासाठी आवश्यक असलेली सर्व गुणपत्रिकेची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे बंधनकारक
वयोमर्यादा
- किमान वय: 18 वर्षे ( जाहिरातीच्या अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचे)
- कमाल वय: 35 वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी: कमाल वयाची मर्यादा 40 वर्षे
- जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक
अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!
विधवा व अनाथ उमेदवारांसाठी विशेष सवलत
- विधवा उमेदवारांसाठी: स्वयंघोषणापत्र व पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जोडावे.
- अनाथ उमेदवारांसाठी: सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक.
महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय 30 जानेवारी 2025 नुसार अतिरिक्त गुण मिळतील.
अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी विशेष लाभ
- अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / मदतनीस म्हणून किमान 02 वर्षांचा अनुभव असल्यास शासन निर्णयानुसार अतिरिक्त गुण मिळतील.
- अनुभव प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकित असावे.
- खाजगी संस्था किंवा अनुदानित संस्थेतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
लहान कुटुंब अट
राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार लहान कुटुंब अट लागू.
अर्जदाराच्या नावात बदल असल्यास
विवाह नोंदणी दाखला / राजपत्र (Gazette) किंवा शपथपत्र जोडणे अनिवार्य.
जातीचे प्रमाणपत्र (आरक्षणासाठी आवश्यक)
- अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाचे जाती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 नुसार अतिरिक्त गुण देण्यात येतील.
स्थानिक रहिवासी अट
- फक्त त्या महसुली गावातील महिला उमेदवारच अर्ज करू शकतात.
- ग्रामपंचायत नव्हे, तर महसुली गाव / वाडी / वस्तीत राहणाऱ्या महिलांनाच अर्ज करता येईल.
- रहिवासी पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जोडावे.
- ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला
- तहसीलदार प्रमाणपत्र
- स्वयंघोषणापत्र
- आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / रेशन कार्ड
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
अर्ज कसा व कोठे सादर करावा?
- तालुका/मनपा स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) यांच्या कार्यालयात संपर्क साधून Anganwadi Recruitment 2025 विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
- सर्व कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून साक्षांकित असावी.
- प्रमाणपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड असेल तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३७१ पदांची या जिल्ह्यात भरती!
निवड प्रक्रिया कशी असेल?
- गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
- अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर आधारित Merit List (गुणवत्ता यादी) तयार केली जाईल.
- अर्ज सादर केल्यानंतर अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
- कोणत्याही प्रकारे खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
मानधन / पगार
- अंगणवाडी सेविका / मदतनीस पदे मानधन स्वरूपाची असतील.
- शासन स्तरावरून ठरविलेले मानधन देण्यात येईल. सविस्तर येथे पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
अंगणवाडी भरती महत्त्वाच्या सूचना
- फक्त त्या महसुली गावातील उमेदवार अर्ज करू शकतात, जिथे पदे रिक्त आहेत.
- एकापेक्षा जास्त रिक्त पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.
- सेविका आणि मदतनीस दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास स्वतंत्र अर्ज आवश्यक.
- भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द किंवा स्थगित करण्याचा अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना राहील.
- शासन निर्णय, परिपत्रक किंवा नवीन सूचना वेळोवेळी लागू असतील.
10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
सारांश
Anganwadi Recruitment 2025 : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित सादर करून संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका/जिल्हा/मनपा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) कार्यालयात संपर्क साधा. शुभेच्छा!
अधिकृत वेबसाईट : https://womenchild.maharashtra.gov.in/