Anganwadi Sevika Mandhan Vad: राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ, सेवासुविधा आणि इतर हक्कांसाठी आंदोलन केले होते. यानंतर विधिमंडळ सदस्य श्री. सुनिल प्रभू (दिंडोशी) आणि श्री. गजानन लवटे (दर्यापूर) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे.
Table of Contents
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- मानधन वाढ: सुमारे २ लाखांपेक्षा जास्त अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे.
- निवृत्तीनंतर लाभ: सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि एकरकमी सेवासमाप्ती लाभ मिळणे.
- शासकीय दर्जा: शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे.
- साहित्य पुरवठा: आवश्यक रजिस्टर आणि इतर साहित्य पुरवणे.
- अतिरिक्त काम नको: अंगणवाडी कामाव्यतिरिक्त इतर कामे न देणे.
- नियमानुसार रजा: नियमानुसार रजा मंजूर करणे.
- पोषण ट्रॅकरमधील अडचणी: नेटवर्क अभावी पोषण ट्रॅकर कामात येणाऱ्या अडचणी दूर करणे.
राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी! किमान वेतनात मोठी वाढ
सरकारचा प्रतिसाद (महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे)
- शासन निर्णय दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२४ अन्वये दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ पासून अंगणवाडी सेविका यांच्या दरमहा मानधनामध्ये रुपये ३०००/- आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या दरमहा मानधनामध्ये रुपये २०००/- वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- ऑक्टोबर, २०२४ पासून सुधारित दरानुसार मानधन अदा करण्यात येत आहे.
- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाच्या आधारे त्यांना दरमहा अनुक्रमे रुपये २०००/- व रुपये १०००/- पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनांसोबत वेळोवेळी बैठका आयोजित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते.
- प्रोत्साहन भत्त्याकरिता विहित केलेल्या निकषांपैकी काही निकषांची पोषण ट्रॅकर ॲप्लीकेशनमधून माहिती उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने प्रोत्साहन भत्ता अदा होऊ शकला नाही. त्यानुषंगाने, प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करून त्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ३१.३३ कोटींचा निधी मंजूर
मुख्य मुद्दे आणि सरकारचा निर्णय Anganwadi Sevika Mandhan Vad
मानधन वाढ Anganwadi Sevika Mandhan Vad
📌 १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू –
🔹 अंगणवाडी सेविका: दरमहा ₹३०००/- वाढ
🔹 अंगणवाडी मदतनीस: दरमहा ₹२०००/- वाढ
📌 ऑक्टोबर २०२४ पासून सुधारित दरानुसार मानधन अदा सुरू
प्रोत्साहन भत्ता
🔹 अंगणवाडी सेविका: दरमहा ₹२०००/- पर्यंत
🔹 अंगणवाडी मदतनीस: दरमहा ₹१०००/- पर्यंत
📌 शासन निर्णयात प्रोत्साहन भत्त्यास मान्यता
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
सेवानिवृत्ती लाभ आणि इतर मागण्या
🔹 पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि सेवासमाप्ती लाभ देण्याबाबत सरकार विचाराधीन
🔹 अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी विचाराधीन
🔹 रजिस्टर आणि आवश्यक कागदपत्रे नियमित उपलब्ध करण्याचा निर्णय
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा स्टेटस कसा पाहाल? ऑनलाईन नाही, तर ऑफलाईन सोप्पा मार्ग!
कामाचे स्वरूप आणि नियमावली
🔹 अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त काम देऊ नये – मूळ जबाबदाऱ्या सांभाळण्यावर भर
🔹 रजा मंजुरी प्रक्रियेला गती देण्याची योजना
डिजिटल आणि टेक्नोलॉजीविषयक समस्या
🔹 पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणीमुळे प्रोत्साहन भत्ता लांबणीवर – यावर सुधारणा लवकरच अपेक्षित
शासन निर्णय: अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भता लागू
अधिक माहितीसाठी: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भता लागू करणेबाबत शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना लवकरच मिळणार प्रोत्साहन भत्ता
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. ३१.३३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचे वितरणही सुरू झाले आहे.
🔹 महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
🔹 विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण देसाई यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता.
🔹 योजनेच्या अंमलबजावणीसाठी पात्र उमेदवारांचे अर्ज अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनी भरले होते.
📌 लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे!
लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच
कोण लाभार्थी?
✅ ‘माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका
✅ प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता
✅ ३१.३३ कोटींचा निधी वितरित
सारांश
सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ (Anganwadi Sevika Mandhan Vad) केली आहे आणि प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना आहे. तसेच, त्यांच्या इतर मागण्यांवर विचार सुरू आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! फेब्रुवारी 2025 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर