CBSE Pattern in Maharashtra 2025: महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसईसारखा अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमात मोठा बदल!

By Marathi Alert

Published on:

CBSE Pattern in Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील शाळांसाठी शिक्षण विभागाने मोठा निर्ण घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर बदलला जाणार आहे. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत माहिती दिली. मात्र, यासोबतच शैक्षणिक वर्ष बदलण्याची चर्चा सुरू झाल्याने शिक्षक, शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले होते. मात्र आता याबाबत शिक्षण विभागाने महत्वपूर्ण खुलासा केला आहे. सविस्तर वाचा.

शाळा कधी सुरू होणार?

अनेकांना शंका होती की, महाराष्ट्रातील शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार का? मात्र, शिक्षण विभागाने याबाबत स्पष्टता दिली आहे. राज्यातील सर्व शाळा (Maharashtra School Academic Year 2025) एप्रिलऐवजी जुनपासूनच सुरू होतील. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन अभ्यासक्रम कसा असेल? CBSE Pattern in Maharashtra 2025

राज्य शिक्षण मंडळाने पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला नवीन अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (New Education Policy Maharashtra) 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदल करण्यात आले आहेत. पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम इतर वर्गांसाठीही लागू केला जाईल.

शिक्षक आणि पालकांचा गोंधळ

शैक्षणिक वर्ष बदलणार असल्याच्या अफवांमुळे शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण विभागाने कोणतीही अधिकृत माहिती न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात आला होता.

शिक्षण विभागाचा खुलासा

राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले आहे की, शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील. मात्र, ‘एनईपी’नुसार पहिली आणि शक्य झाल्यास दुसरीसाठी नवे अभ्यासक्रम आणि बदललेल्या पद्धतीने शिक्षण दिले जाईल, परंतु शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील.

महत्त्वाचे मुद्दे:

  • शाळा 1 एप्रिलऐवजी जुनमध्येच सुरू होणार.
  • पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू.
  • अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर तयार.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार टप्प्याटप्प्याने बदल.
  • इतर वर्गांसाठी वेळापत्रकात कोणताही बदल नाही.

NMMS Result : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल जाहीर

निष्कर्ष

महाराष्ट्र सरकारने CBSE पॅटर्न (CBSE Pattern in Maharashtra 2025) आधारित नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 नुसार तयार करण्यात आला असून, पहिलीपासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल.

मात्र, शैक्षणिक वर्ष बदलण्याबाबतची चर्चा निराधार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील, त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नवीन अभ्यासक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सकारात्मक बदल घडवेल.

MarathiAlert.com वर आम्ही तुम्हाला अचूक, उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि कर्मचारी अपडेट्स यांसारख्या विविध विषयांवर लेख लिहण्याचा आमचा 6 वर्षाचा अनुभव आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!