CET Cell Edit Facility Notice 2025 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई (CET Cell) कडून एक महत्वपूर्ण जाहीर सूचना देण्यात आली आहे. MAH. B. BBA/BCA/BMS/BBM/ MBA आणि MCA Integrated) CET 2025 या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा (Edit Facility) ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध झाली आहे. याबाबतची जाहीर सूचना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
CET Cell Edit Facility Notice 2025 जाहीर सूचना
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महा-बी. बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमस एमबीए (इंटिग्रेटेड) एमसीए (इंटिग्रेटेड) सीईटी २०२५ या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता ज्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करुन पुर्ण केलेली आहे. त्यापैकी काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या असून त्या दुरुस्त करण्याबाबत राज्य कार्यालयाकडे लॉगीनमधून, दुरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आली होती.
त्यानुसार सदर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जात खालील नमूद माहिती मध्ये बदल करण्याबाबत संधी देण्यात आली आहे.
- उमेदवाराचे नाव
- जन्मतारीख
- छायाचित्र
- सही
- लिंग
उमेदवारांना वरील बदल करण्याचा कालावधी दिनांक 11 एप्रिल 2025 ते 13 एप्रिल 2025 असून या कालावधीमध्ये उमेदवारांनी स्वतःच्या लॉगीनमधून अर्जामध्ये सुधारणा करावी.
MHT CET Free Mock Test PDF Download Here
अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/
