CRP ICRP SHG Salary GR : महाराष्ट्र शासनाने सामुदायिक संसाधन व्यक्ती (Community Resource Person – CRP), प्रेरिका (ICRP) आणि सखी यांच्यासाठी वाढीव दराने मानधन व स्वयंसहाय्यता गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी मंजूर केला आहे. तसेच स्वयं-सहाय्यता गटांना (Self-Help Groups – SHGs) मिळणाऱ्या फिरत्या निधीत (Revolving Fund – RF) देखील वाढ करण्यात आली आहे. या वाढीव निधीप्रमाणे नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीतील निधी मंजूर करण्यात आला आहे.
Table of Contents
वाढीव दराने मानधन देण्याचा निर्णय
संभाजीनगर येथील दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अंगणवाडी भरती जाहिरात आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
लाडकी बहीण योजना ‘या’ महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत!
तसेच उमेद– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्यःस्थितीत “अ”, “ब” व “क” वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्यात येतो. यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करुन “अ” वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना रु.३०,०००/- व वर्गवारी “ब” व “क” मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत शासन निर्णय (CRP ICRP SHG Salary GR) निर्गमित करण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू
कर्मचाऱ्यांना DA, OPS, बालसंगोपन रजा, कंत्राटी पद्धतीऐवजी नियमित कर्मचारी भरती – सविस्तर जाणून घ्या
शासन निर्णय : या तीन महिन्यांचे मानधन मंजूर
अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीमधून माहे नोव्हेबर २०२४, डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२४ या तीन महिन्यांचे समूह संसाधन व्यक्ती/ प्रेरिका/सखी (CRP ICRP SHG Salary GR) यांचे मानधन रक्कम रु.४३,९८,७६,५००/- इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा
10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
महत्त्वाचे ठळक मुद्दे
- CRP, ICRP आणि सखी यांना दरमहा ₹6,000 पर्यंत मानधन दिले जाणार. (पूर्वी ₹3000 होते)
- स्वयं-सहाय्यता गटांना (SHGs) वाढीव फिरता निधी (Revolving Fund) वितरित केला जाणार
- “अ” वर्गवारीतील SHGs साठी ₹30,000 (पूर्वी ₹15,000 होते)
- “ब” आणि “क” वर्गवारीतील SHGs साठी पूर्वीप्रमाणेच निधी वितरित केला जाईल.
एकूण अर्थसंकल्पीय तरतूद: ₹172.4825 कोटी - नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीसाठी वितरित निधी: ₹43,98,76,500/-
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
केंद्र सरकारच्या नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन