राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियमांमध्ये मोठे बदल! DCPS NPS Latest Update Maharashtra

By Marathi Alert

Published on:

DCPS NPS Latest Update Maharashtra : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS) अंतर्गत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार, 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर राज्य सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नवी तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

मुख्य निर्णय आणि सुधारणा

  1. सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास:
  1. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी:
  • निवृत्ती उपदान आणि वैद्यकीय निवृत्ती अनुदान लागू.
  • शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळणार.
  1. अनुदान धोरणातील सुधारणा:
  • पूर्वीच्या योजनांमध्ये सुधारणा करून नवीन धोरण लागू.
  • याआधी मंजूर असलेली सानुग्रह अनुदान योजना रद्द करण्यात आली आहे.
  1. शासन निर्णयाची अंमलबजावणी:
  • सर्व संबंधित प्रशासनांना लवकरात लवकर ही योजना लागू करण्याचे आदेश.
  • जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार.

जुनी पेन्शन योजनेसाठी उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DCPS/NPS योजनेतील महत्त्वाचे बदल:

शासन शुध्दीपत्रक दिनांक २४ फेब्रुवारी २०२५

शासन निर्णय दि. १४.६.२०२३ परिच्छेद क्र.१ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
दिनांक १४ जून २०२३ रोजीच्या GR मध्ये काय आहे?

दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा – याऐवजी पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजीचा शासन निर्णय नुसार खालीलप्रमाणे सुधारणे करण्यात आली आहे.

DCPS NPS Latest Update Maharashtra

दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतूदी लागू असलेल्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येतील.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

Leave a Comment

error: Content is protected !!