Disha Curriculum: राज्यातील बौद्धिक अक्षम (Intellectual Disabled) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व विशेष शाळांमध्ये आता ‘दिशा’ (DISHA) अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रणाली राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात कडक निर्देश दिले असून, या निर्णयामुळे विशेष मुलांच्या शिक्षणात एकसमानता आणि दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
Disha Curriculum नेमका निर्णय काय?
शासनाने १९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील बौद्धिक अक्षम प्रवर्गाच्या सर्व विशेष शाळांना ‘दिशा पोर्टल’वर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या Disha Curriculum ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबईसाठी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
जय वकील फाऊंडेशन आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो नॅशनल इन्स्टिट्यूट (NIEPID) कडून प्रमाणित आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम’ (IEP) महत्त्वाचा या नवीन पद्धतीनुसार, आता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम’ (IEP) तयार करणे शिक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे.
पालकांचा सहभाग: शिक्षकांनी पालक आणि थेरपिस्ट यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यासाठी वार्षिक ध्येये (Goals) निश्चित करायची आहेत.
मूल्यमापन: विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी वर्षातून दोनदा (दिवाळीपूर्वी आणि मार्च/एप्रिलमध्ये) मूल्यमापन केले जाईल.
थेरपी: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांसाठी २ ते ३ वैयक्तिक थेरपी कार्यक्रमाची (ITP) उद्दिष्टे ठरवून त्यांची अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे.
शाळा आणि शिक्षकांसाठी कडक नियमावली केवळ अभ्यासक्रम लागू करून चालणार नाही, तर तो योग्य प्रकारे शिकवला जात आहे की नाही, यावर शासनाचे बारीक लक्ष असणार आहे.
प्रशिक्षण: सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी Disha Curriculum संदर्भातील ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रशिक्षणांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
अध्यापन पद्धती: शिक्षकांनी बहुसंवेदी (Multisensory) अध्यापन पद्धतीचा वापर करूनच विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे.
काटेकोर नियोजन: शाळेतील वेळापत्रक, पाठ नियोजन (Lesson Plan) आणि दृश्य वेळापत्रक (Visual Schedule) यांचा वापर वर्गात करणे आवश्यक करण्यात आले आहे.
कामचुकार शाळांवर कारवाईचा बडगा विशेष शाळांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत सचिव तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ज्या शाळा Disha Curriculum राबविणार नाहीत किंवा सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांचे शासकीय अनुदान थांबविले जाईल, तसेच संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
चांगल्या शाळांना मिळणार ‘प्रमाणपत्र’ दुसरीकडे, जे मुख्याध्यापक आणि शाळा या उपक्रमात उत्कृष्ट काम करतील, त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर योजनाही आहे. पोर्टलवरील ८०% विद्यार्थ्यांचे बेसलाईन काम पूर्ण करणाऱ्या आणि सर्व निकष पाळणाऱ्या शाळांना “दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा” (Disha Implementing Schools) म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
हा निर्णय राज्यातील विशेष मुलांच्या पालकांसाठी दिलासादायक असून, यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची पुस्तके आणि कार्यपुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी : Disha Curriculum PDF शासन निर्णय डाउनलोड करा



