जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य मराठी

By MarathiAlert Team

Published on:

जागतिक दिव्यांग दिन हा दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. अपंग व्यक्तींच्या समस्या, हक्क आणि त्यांच्या प्रगतीबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

जागतिक दिनाची सुरुवात

संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) सन १९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगात दिव्यांग बांधवांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो.

महाराष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय: स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय

यंदाच्या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ‘दिव्यांग कल्याण विभाग – दिव्यांग मंत्रालय’ कार्यान्वित होईल अशी घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

या स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाचे योजना लाभार्थींपर्यंत सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

सहानुभूती नव्हे, आपुलकी आणि संधी

जागतिक दिव्यांग दिन हा समाजाला आपल्या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा दिवस आहे. एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, आपण जे करू शकतो ते सर्व काही दिव्यांग बांधव देखील करू शकतात. म्हणूनच त्यांना केवळ सहानुभूती नाही, तर आपुलकीची गरज आहे.

अपंग व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील अडथळे दूर करणे, त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ३ डिसेंबर रोजी जगभरात विविध कार्यक्रम आयोजित करून या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातात.

जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य – Divyang Ghosh Vakya

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिलेले सर्व घोषवाक्य खालीलप्रमाणे आहेत:

  • हक्क देऊ, संधी देऊ, दिव्यांगाना प्रोत्साहन देऊ.
  • दिव्यांगाना देऊ संधी, वाहील विकासाची नांदी.
  • सर्वांचा निर्धार, दिव्यांगाचा स्विकार.
  • मिळून सारे ग्वाही देऊ, दिव्यांगाना सक्षम बनवू.
  • दिव्यांगाचा सन्मान, हाच आमचा अभिमान.
  • तुमचा आमचा एकच नारा, दिव्यांगाना देऊ सहारा.
  • ऊठ दिव्यांग जागा हो, समाजाचा धागा हो.
  • समाजाला जागवू या, दिव्यांगाना सक्षम बनवूया.
  • एकासारखं दुसर नसतं सर्वांना बरोबर घ्यायचं असतं ! दिव्यांग असो, वा अपंग सगळ्यांनाच पुढे न्यायचं असतं..!
  • नको बोल सहानुभूतीचे, शिक्षण द्या दिव्यांगाना हक्काचे..!
  • दिव्यांगाना समान संधी, हिच प्रगतीची नांदी…!
  • सामावेशित शिक्षण आले दारी, विशेष मुलांची प्रगती भारी.
  • समग्र शिक्षा अभियानाची निर्मिती, सामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांगांची उन्नती !
  • हातात हात द्या, विशेष मुलांना साथ द्या.
  • समाजाला जागवू या, दिव्यांगांना सक्षम बनवूया.
  • दया नको संधी द्या ! विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना सामावून घ्या.
  • डरने की क्या बात है। हम दिव्यांग के साथ है !
  • दिव्यांगाचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
  • समावेशित शिक्षण, दिव्यांगाच्या हक्काचे रक्षण.
  • दिव्यांगाना शिकवू, समाजात त्यांना टिकवू.
  • एकमेकांच्या सहकार्यने एकत्र येणार, दिव्यांगाचे निश्चित कल्याण होणार.
  • निरक्षरता निर्मूलनाचा एकच उपाय, सर्वांच्या शिक्षणाशिवाय नाही पर्याय.
  • दिव्यांगाना साथ दया, मदतीचा हात द्या.
  • लगंडा पांगळा म्हणु नका. दिव्यांगाना हिनवू नका.
  • एक-दोन-तीन-चार, दिव्यांग म्हणजे नाही भार, पाच-सहा-सात-आठ, अपंगांना दाखवा वाट.
  • अ-आई, ब-बाबा, अपंग सुदधा मिळवतात शिक्षणावर ताबा.
  • शिक्षणाचा कायदा, दिव्यांगाच्या शिक्षणाचा वायदा.
  • शिक्षणाचा अधिकार, दिव्यांगाचा स्वीकार.
  • आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण दिव्यांगाचाही हक्क.
  • दिव्यांगाचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
  • सोडून देऊया वाईट अंधश्रद्धा चालीरीती, दिव्यांगाच्या शिक्षणाला देऊया गती.
  • दिव्यांगाना देऊ समान वागणूक, करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
  • दिव्यांग मित्रांना सहानुभूती नव्हे, विश्वास दाखवा.
  • दिव्यांग बांधवांना सन्मानाचा, समानतेचा हक्क देऊया, चला, एक समतोल समाज घडवूया..
  • सहानुभूती नको, आपुलकी दाखवा.
  • सहानुभूती नवे विश्वास देऊया, प्रत्येक दिव्यांगाला आपुलकीची साथ देऊया.
  • सहानुभूती नको, सहकार्य आणि आधार द्या.
  • मदतीसोबत संधीचा हात ठेवूया, दिव्यांग बांधवांसाठी सन्मानाचे स्थान ठेवूया.
  • बोलता येत नसलं म्हणून काय झालं, मला ही ‘वाचा’ आहे नां !
  • ऐकता येत नसलं म्हणून काय झालं, मला ही ‘जाणीव’ आहे नां !
  • दिसत नसलं म्हणून काय झालं, मला ही ‘स्पर्श’ आहे नां!
  • बुध्दि नसली म्हणून काय झालं, मला ही ‘समज’ आहे नां !
  • चालता येत नसलं म्हणून काय झालं, माझ्यातही ‘हिम्मत’ आहे नां !
  • दिव्यांग असलो म्हणून काय झालं, ‘मी’ ही एक ‘माणूसचं’ आहे नां..
  • देऊनी त्यांना समान वागणूक, करूया त्यांच्या भावनांची जपणूक.

समाजातील अंध, मुके, बहिरे, किंवा इतर व्यंग असलेल्या व्यक्तींना सहानुभूती नको तर विश्वास दाखवा. त्यांना परावलंबी जीवन नको तर स्वावलंबी बनवायचे आहे. चला तर मग मदतीचा हात व साथ देऊ या.

जागतिक दिव्यांग दिन: ३ डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? – एक माहितीपूर्ण लेख

समावेशन

शाळेत जाता नाते जडते।

पुस्तकावीण सारेच घडते ।

ज्ञानाचे, प्रगतीचे, भांडार उघडते ।।

विद्यादानाचे समाधान मिळते ।

सर्व समावेशनाने दिव्यांगाचे शिक्षण होते ।।

त्यामुळे भावापिढीचे भविष्य घडते ।

म्हणूनची सर्व समावेशाचेच महत्व कळते ।

नव्या युगाला नव्या पिढीला

नव्या शतकाचे व्दार उघडते ।

सर्वांच्या उत्तम सहकार्याने

शिक्षणाचे नवे पर्व सुरू होते ।

सर्व दिव्यांगाचे उत्तम शिक्षणात समावेशन होते।।

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!