Foreign Scholarship Scheme राज्यातील विजाभज (विमुक्त जाती व भटक्या जमाती), इमाव (इतर मागास वर्ग) आणि विमाप्र (विशेष मागास प्रवर्ग) या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायक संधी उपलब्ध झाली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागवले आहेत, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती पाहूया.
Table of Contents
Foreign Scholarship Scheme संपूर्ण माहिती
या योजनेचा उद्देश मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरविणे आहे. QS World University Ranking मध्ये २०० च्या आतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना या योजनेतून लाभ दिला जातो, आणि ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमानुसार शाखानिहाय दिली जाते.
अर्ज करण्यासाठी पात्रता अटी
- अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
- विजाभज, इमाव किंवा विमाप्र प्रवर्गातील असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा जास्त नसावे (वर्ष २०२४-२५ साठी).
- वयोमर्यादा –
- ◾ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी: ३५ वर्षे
- ◾ पीएच.डी. साठी: ४० वर्षे
- पात्र संस्थांची QS रँकिंग (२०२५) २०० च्या आत असावी.
- शैक्षणिक पात्रता –
- ◾ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी: पदवी परीक्षेत किमान ५५% गुण
- ◾ पीएच.डी. साठी: पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण
योजनेच्या फायदे व शिष्यवृत्तीचा स्वरूप
शिक्षण फी: अन्कंडीशनल ऑफर लेटरमध्ये नमूद कालावधीसाठी थेट शैक्षणिक संस्थेला दिली जाईल.
निर्वाह भत्ता / आकस्मिक खर्च:
- USA व इतर देशांसाठी: $1500 USD दरवर्षी
- UK साठी: £1100 GBP दरवर्षी
इकॉनॉमी क्लास विमान प्रवास: भारत ते परदेश आणि परत.
वैयक्तिक आरोग्य विमा: विद्यापीठाच्या निकषानुसार.
भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार – - USA व इतर देशांसाठी: $15,400 USD
- UK साठी: £9900 GBP (किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी कमी रक्कम)
अर्ज कसा करावा?
- अर्ज https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करा.
- संपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रांची दोन प्रती १७ मे २०२५ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत खालील पत्त्यावर सादर करा:
या ठिकाणी अर्ज सादर करा
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज डाउनलोड करावा. हा अर्ज परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह १७ मे २०२५ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम एच बी कॉलनी, म्हाडा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समता नगर, येरवडा पुणे ४११००६ येथे दोन प्रतीत सादर करावा.
परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाचे अटी व शर्ती इत्यादी सविस्तर माहितीसाठी विभागाच्या https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळला भेट द्यावी.