Govt Approval Health Department New Posts : राज्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांना बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत २,०७० नवीन पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या अंतर्गत २,०७० नवीन पदनिर्मितीसाठी मान्यता
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, नव्याने स्थापन करण्यात आलेली तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रे यासाठी आवश्यक असणाऱ्या पदांचे आकृतीबंध निश्चित करण्यात आले आहेत.
या शासन निर्णयानुसार राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.
यामध्ये ८६ आरोग्य संस्थांसाठी ८३७ नियमित पदे आणि १,२३३ कुशल/अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन
राज्यातील या आरोग्य संस्थांचा समावेश
- ४७ उपकेंद्रे
- १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे
- ५ ग्रामीण रुग्णालये
- २ ट्रॉमा केअर युनिट
- ४ स्त्री रुग्णालये
- १० उपजिल्हा रुग्णालये
- २ जिल्हा रुग्णालये
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू
राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्याने रिक्त पदे (Govt Approval Health Department New Posts) भरण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच, यापूर्वी प्रतीक्षा यादीत असलेल्या ४०८ एमबीबीएस गट अ आणि २५ बीएएमएस गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सूचित केले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी : आरोग्य विभागाच्या २,०७० नवीन पदनिर्मितीस मान्यता, बाबतचा शासन निर्णय पाहा
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
आरोग्य विभाग अधिकृत वेबसाईट : https://phd.maharashtra.gov.in/