HSRP Number Plate Registration Deadline राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत होती, पण वाहन मालकांकडून मिळालेला कमी प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
HSRP Number Plate Registration Deadline
HSRP पाटी का आहे महत्त्वाची?
- HSRP पाटी ही वाहनांची सुरक्षा आणि ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
- या पाटीवर एक खास कोड आणि सुरक्षा चिन्हे असतात, ज्यामुळे वाहनांची चोरी झाल्यास ती शोधणे सोपे होते.
- त्याचबरोबर या पाटीमुळे बनावट नंबर प्लेट तयार करणे शक्य होत नाही.
पाटी कशी बसवावी?
- ज्या वाहनधारकांना अद्याप ही पाटी बसवायची आहे, त्यांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.
- एकदा अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर, ती मुदत ३० नोव्हेंबर २०२५ च्या पुढे असली तरीही तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
मुदत संपल्यानंतर काय होणार?
- ज्या वाहनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP पाटी बसवलेली नाही किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नाही, अशा वाहनांवर १ डिसेंबर २०२५ पासून वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई केली जाईल.
या संदर्भात, सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी सर्व वाहन मालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या अंतिम मुदतीचा लाभ घेऊन आपल्या वाहनांवर लवकरात लवकर HSRP पाटी बसवून घ्यावी.