राज्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात शिक्षण संचालनालयाने दिले महत्वाचे निर्देश

By Marathi Alert

Updated on:

Kendra Pramukh Promotion: राज्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती देताना सेवाजेष्ठता यादी तयार करण्यासाठी कोणती तारीख ग्राह्य धरण्यात यावी आणि शिक्षकांची सेवा कालावधी संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ‘ही’ दिनांक ग्राह्य धरणार

राज्यातील केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता (Kendra Pramukh Promotion) सेवाजेष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंरतु याअनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी याबाबत शासन निर्णय दि.27 सप्टेंबर 2023 मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदांना दिले आहे.

केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ‘इतकी’ वर्ष सेवा आवश्यक असणार

Center Heads Promotion: केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणा-या उमेदवारांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्याबाबत शासन निर्णय दि.२७/९/२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य रोजंदारी संघटनेचे आंदोलन; वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या काय आहेत मागण्या?

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी काढा – महिला व बालविकास मंत्री

Kendra Pramukh Promotion

Leave a Comment