मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पहिले यशस्वी वर्ष पूर्ण! Ladki Bahin Yojana New Update

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update दिनांक २९ जून २०२५ रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‘ या महत्त्वाकांक्षी योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले होते. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली ही योजना आजही त्याच उत्साहात आणि ताकदीने राबवली जात आहे.

Ladki Bahin Yojana New Update

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, या एका वर्षात महाराष्ट्रातील गावागावात जाऊन अनेक भगिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने त्यांच्या आयुष्यात किती मोठा सकारात्मक बदल घडवला आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. या योजनेतून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक महिला आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत आहेत. काहींनी या सन्माननिधीतून स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे, तर अनेक ठिकाणी भगिनींनी एकत्र येऊन मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे. या प्रेरणादायी यशोगाथा ऐकून नेहमीच अभिमानाने ऊर भरून येतो.

Ladki Bahin Yojana New Update

महिला सक्षमीकरणाची ही ज्योत गावागावात, घरोघरी पोहोचवण्याची आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि या यशाच्या खऱ्या शिल्पकार असलेल्या ‘लाडक्या बहिणीं’चे मनःपूर्वक आभार! महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मानले आहे.

हे एक वर्ष महिला सक्षमीकरणाचे, सामाजिक बदलाचे आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे ठरले आहे. ही योजना महाराष्ट्राच्या विकासात आणि महिलांच्या आत्मनिर्भरतेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांसाठी खुशखबर, आता 9% अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध!

अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!