Maharashtra Budget Session 2025: विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकार संतुलित आणि आर्थिक शिस्त पाळणारा अर्थसंकल्प मांडण्याच्या दिशेने कार्यरत आहे. भांडवली खर्चावर कोणताही परिणाम न होता, कोणतीही महत्त्वाची योजना बंद न करता हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. (Maharashtra Budget 2025)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. (Maharashtra Budget Session 2025)
Table of Contents
महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा विषय Maharashtra Budget Session 2025
- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 सोमवार, 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत विधानभवन, मुंबई येथे पार पडणार आहे. हे अधिवेशन चार आठवड्यांचे असेल.
- महिला दिन विशेष चर्चा – ८ मार्च २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त विधानसभेत विशेष चर्चा होणार.
- भारतीय संविधानावर विशेष चर्चा – संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन दिवसांच्या चर्चेचे आयोजन.
- पाच महत्त्वाच्या विधेयकांवर निर्णय – राज्याच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा आणि कायदेविषयक सुधारणा प्रस्तावित.
- विधिमंडळातील नवीन सदस्यांचा सहभाग – सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी सर्व सदस्यांना संधी.
महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी जमा होणार? त्वरित चेक करा
आरोग्य विभागाच्या फाईलवर स्थगिती नाही
आरोग्य विभागाच्या एका फाईलवर स्थिगिती दिल्याच्या बातमीचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. अशा प्रकारची कोणतीही फाईल माझ्याकडे आली नाही व मी स्थगिती दिलेली नाही.
आरोग्य विभागाच्या संबंधित विषयात केंद्र शासनाला सुचविलेल्या कामातील 9 टक्के निधी हा भांडवली खर्चावर खर्च करणार होते. मात्र, केंद्र शासनाने भांडवली खर्चावर 5 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली. त्यानुसार, प्राधान्यक्रम ठरवून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, सचिवांनी प्राधान्य ठरविण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे ही फाईल माझ्याकडे आली नाही. (Health Department Maharashtra)
आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना मोठी भेट!
वाहनांच्या एचएसआरपी नंबर प्लेटचे दर HSRP Number Plate Price In Maharashtra
एचएसआरपी नंबर प्लेटच्या किंमतीबाबतही स्पष्टता – वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचे दर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी आहेत. महाराष्ट्रातील दरांमध्ये जीएसटी आणि प्लेट बसवण्याच्या खर्चाचा समावेश आहे. (Hsrp Number Plate Price In Maharashtra नवीन दर पाहा)
सोयाबीन खरेदी
सोयाबीन खरेदीत विक्रमी वाढ – यंदाच्या वर्षी मागील १५ वर्षांच्या तुलनेत दहा पट अधिक खरेदी झाली असून, गोदामांमध्ये साठवणुकीसाठी जागा अपुरी आहे. (Soybean purchase)
माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता अखेर मिळणार!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान आणि सरकारची भूमिका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचे बोलले तर खपवून घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणारच असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून त्यांच्याबद्दल आम्हाला पुरेपूर माहिती आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आम्ही काम करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार, पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!
महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्य सरकारची भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने गेल्या १०० दिवसांत केलेल्या कामांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
🔹 ७,००० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
🔹 सरकारी कार्यालये अधिक स्वच्छ आणि कार्यक्षम बनवण्यावर भर.
🔹 केंद्र सरकारच्या “क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया” द्वारे कामकाजाचे मूल्यमापन होणार.
राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू असून, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन – विरोधकांना संवादाची संधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्य सरकार लोककल्याणकारी योजनांवर भर देत असून, विकासाची गती दुप्पट आणि वेग चौपट असेल. त्यांनी विरोधी पक्षांना आवाहन केले की, ते संसदेच्या चर्चेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि जनतेच्या प्रश्नांना मांडावे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यपालांचे अभिभाषण, पुरवणी मागण्या आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. राज्य सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० ऐवजी २१०० होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!
महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरली आहे. या योजनेत अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत चे ७ हप्ते वितरित करण्यात आले आहे. फेब्रुवारी हप्ता देखील मंजूर करण्यात आला आहे. तर महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे. सविस्तर अपडेट येथे पाहा (Ladki Bahin Yojana 8th Installment Date)
आता राज्यातील महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण होणार का? म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० ऐवजी २१०० रुपये होणार का? याकडे राज्याच्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Budget Session 2025)
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि विकासात्मक धोरणं!
📌 विकास, आर्थिक शिस्त आणि लोककल्याणकारी योजना – महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे तीन मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. (Maharashtra Budget Session 2025)
अधिक माहितीसाठी भेट द्या: 👉 www.maharashtra.gov.in