Maharashtra DA GR महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात, ११ ऑगस्ट, २०२५ रोजी वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
महागाई भत्त्याचा नवीन दर
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा दर ५३% वरून ५५% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
- हा नवीन दर १ जानेवारी, २०२५ पासून लागू होईल.
- ७ व्या वेतन आयोगानुसार, सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावर हा महागाई भत्ता दिला जाईल.
- फरकाची रक्कम कधी मिळणार?
- महागाई भत्त्यातील वाढीव रक्कम १ जानेवारी, २०२५ ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट २०२५ च्या वेतनासोबत रोखीने दिली जाईल.
DA Calculator : महागाई भत्ता कॅल्क्युलेटर, तुमचा पगार तपासा!
५व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ: ज्या कर्मचाऱ्यांचा पगार ५व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेत आहे, त्यांचा महागाई भत्ता ४५५% वरून ४६६% करण्यात आला आहे. ही वाढ १ जानेवारी, २०२५ ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट २०२५ च्या पगारात रोख स्वरूपात दिली जाईल. शासन निर्णय
६व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ: ज्या कर्मचाऱ्यांचा पगार ६व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेत आहे, त्यांचा महागाई भत्ता २४६% वरून २५२% करण्यात आला आहे. ही वाढ देखील १ जानेवारी, २०२५ पासून लागू होईल आणि १ जानेवारी, २०२५ ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीची थकबाकी ऑगस्ट २०२५ च्या वेतनासोबत रोख स्वरूपात दिली जाईल. शासन निर्णय