Maharashtra HSC Result 2025 श्रेणी व गुणसुधार योजना जाहीर – कोण पात्र, किती वेळा परीक्षा देता येणार? संपूर्ण माहिती

Published On: May 5, 2025
Follow Us
Maharashtra HSC Result 2025

Maharashtra HSC Result 2025 महाराष्ट्र राज्यातील १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली असून ९१.८८% इतका एकूण निकाल लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

ते म्हणाले की, “बारावी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता त्यांच्या पुढे अनेक संधी खुले झाल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जात देशाच्या प्रगतीत भर घालावी.”

तसेच, ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी निराश न होता नव्या जोमाने तयारी करून पुढच्या वेळेस यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Maharashtra HSC Result 2025 यंदाचा निकाल: मुख्य वैशिष्ट्ये

  • परीक्षेचा कालावधी: 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
  • एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: 14,27,085
  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी: 14,97,969
  • उत्तीर्ण विद्यार्थी: 13,02,873
  • एकूण टक्केवारी: 91.88%

मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक

  • मुलं उत्तीर्ण: 6,76,972 (89.51%)
  • मुली उत्तीर्ण: 6,25,901 (94.58%)
    ➡️ म्हणजे मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% जास्त आहे.

श्रेणीवार यश

  • प्रावीण्यासह प्रथम श्रेणी: 1,49,932
  • प्रथम श्रेणी: 4,07,438
  • द्वितीय श्रेणी: 5,80,902
  • उत्तीर्ण श्रेणी: 1,64,601

विभागानिहाय निकाल

विभागटक्केवारी
कोकण96.74% (सर्वाधिक)
कोल्हापूर93.64%
मुंबई92.93%
छत्रपती संभाजीनगर92.24%
अमरावती91.43%
पुणे91.32%
नाशिक91.31%
नागपूर90.52%
लातूर89.46% (कमी)

शाखानिहाय निकाल

शाखाटक्केवारी
विज्ञान97.35%
वाणिज्य92.68%
व्यवसाय अभ्यास83.26%
कला80.52%
ITI82.03%

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल

  • एकूण परीक्षार्थी: 7,258
  • उत्तीर्ण: 6,705
  • उत्तीर्णतेची टक्केवारी: 92.38%

श्रेणीसुधार, गुणसुधार योजना

  • ज्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयात उत्तीर्णता मिळवली आहे, त्यांना त्यांच्या गुणांत सुधारणा करण्यासाठी तीन अतिरिक्त संधी दिल्या जातील.
  • हे सुधार परीक्षांचे टप्पे:
    1. जून-जुलै 2025
    2. फेब्रुवारी-मार्च 2026
    3. जून-जुलै 2026

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या 3 परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment