HSC Result Link 2025 Check mahresult Official Website 9 Direct Link

Published On: May 5, 2025
Follow Us
HSC Result Link 2025

HSC Result Link 2025 या निकालाची अधिकृत घोषणा mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी एकाच वेळी वेबसाईट हॅंग होऊ नये यासाठी बोर्डाकडून 9 अधिकृत लिंक जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात दिलेल्या 12th Hsc Result Link वर तुम्ही लगेचच निकाल पाहू शकता.

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC – 12वी) परीक्षेचा निकाल आज सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. ही माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.

राज्याच्या पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा पार पडली होती.

बारावीचा निकाल जाहीर: कोकण पुन्हा अव्वल, लातूर विभाग पिछाडीवर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४ टक्के निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी – ८९.४६ टक्के लागला आहे.

यंदा १४ लाख २७ हजार ८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला

  • मुलींचा निकाल – ९४.५८%
  • मुलांचा निकाल – ८९.५१%
  • म्हणजेच, मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.०७ टक्के अधिक आहे.

विभागनिहाय निकाल (टक्केवारीत):

  • कोकण – 96.74%
  • कोल्हापूर – 93.64%
  • मुंबई – 92.93%
  • छत्रपती संभाजीनगर – 92.24%
  • अमरावती – 91.43%
  • पुणे – 91.32%
  • नाशिक – 91.31%
  • नागपूर – 90.52%
  • लातूर – 89.46%

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर 12 वी परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार आहे. बारावी निकाल पाहण्यासाठी हॉल तिकीट वरील सीट नंबर आणि आईचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे.

  • सर्वप्रथम खालील पैकी कोणतीही अधिकृत वेबसाईट वर जा.
  • त्यानंतर HSC Result 2025, View Result या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा Seat Number आणि आईचे नाव (Mother Name) टाका.
  • Submit’ बटणावर क्लिक करा
  • स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल
  • निकाल PDF स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा व प्रिंट काढून घ्या.

HSC Result Official Website Direct Link

  1. https://hscresult.mahahsscboard.in/
  2. mahahsscboard.in
  3. mahresult.nic.in
  4. hscresult.mkcl.org
  5. https://results.digilocker.gov.in/
  6. https://results.targetpublications.org
  7. https://results.navneet.com
  8. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
  9. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
  10. https://www.indiatoday.in/education-today/results
  11. https://www.aajtak.in/education/board-exam-results

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment