‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा सुरू!

By MarathiAlert Team

Published on:

Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3 : राज्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेला आणि वातावरणाला नवी दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पास येत्या ३ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू वात झाली आहे. महाराष्ट्र शासनाने या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला नुकतीच मान्यता दिली असून, राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हे स्पर्धात्मक अभियान ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात विजेत्या शाळांना तब्बल ७२ कोटी २२ लाख रुपयांची विक्रमी पारितोषिके दिली जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा महत्त्वाचे टप्पे आणि कालावधी

  • पूर्वतयारी – २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५
  • अभियानाची सुरुवात – ३ नोव्हेंबर २०२५
  • अभियानाचा कालावधी समाप्ती – ३१ डिसेंबर २०२५
  • मूल्यांकनाची प्रक्रिया – १ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६
  • राज्यस्तरीय पारितोषिक वितरण – मूल्यांकन प्रक्रियेनंतर

मूल्यांकनाचे स्वरूप: काय तपासले जाणार?

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात सहभागी शाळांचे मूल्यांकन एकूण २०० गुणांवर आधारित असेल. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे:

  • पायाभूत सुविधा: ३८ गुण
  • शासन ध्येय धोरण अंमलबजावणी: १०१ गुण
  • शैक्षणिक संपादणूक: ६१ गुण

या अभियानासाठी शाळांची विभागणी दोन मुख्य वर्गवारीत करण्यात आली आहे: (अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि (ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा. बृहन्मुंबई महानगरपालिका, ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका क्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा विविध स्तरांवर स्वतंत्रपणे विजेते निवडले जातील.

Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 साठी बक्षिसे

राज्यातील शाळांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावरच नव्हे, तर आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि क्रीडा यांसारख्या घटकांबद्दल जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शालेय प्रशासनाचे बळकटीकरण करणे आणि शैक्षणिक संपादणूक वाढीस प्रोत्साहन देणे, यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अभियानामुळे शाळांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भौतिक सुविधा सुधारण्यासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे.

पारितोषिकांचे आकर्षक स्वरूप

या अभियानात तालुका, जिल्हा, महानगरपालिका, विभाग आणि राज्य स्तरावर पारितोषिके दिली जाणार आहेत. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी स्वतंत्र पारितोषिके असतील.

  • राज्यस्तरीय पारितोषिक (प्रथम): ५१ लाख रुपये (प्रत्येक वर्गवारीसाठी)
  • विभागस्तरीय पारितोषिक (प्रथम): २१ लाख रुपये (उर्वरित महाराष्ट्र)
  • तालुकास्तरीय पारितोषिक (प्रथम): ३ लाख रुपये

या स्पर्धेमध्ये एकूण ७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके वितरित केली जाणार आहेत. या निधीचा विनियोग करण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस (SMC) असणार आहे, ज्यामुळे शाळांना त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करता येतील.

मागील टप्प्यातील (टप्पा-एक किंवा टप्पा-दोन) क्रमांक कायम ठेवून किंवा त्यापेक्षा खालचा क्रमांक मिळवणाऱ्या शाळांना यावर्षीच्या पारितोषिकांसाठी विचारात घेतले जाणार नाही. मात्र, मागील वर्षापेक्षा वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविल्यास शाळा पात्र ठरतील. या सर्व स्तरांवर सर्वोत्तम कार्य करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3 हा राज्यातील शाळांना अधिक सुसज्ज आणि विद्यार्थ्यांसाठी अध्ययनपूरक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या अभियानातून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्याची अपेक्षा आहे. सर्व शाळांनी या अभियानात उत्साहाने सहभागी होऊन आपल्या शाळांना सुंदर आणि गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3

अधिक माहितीसाठी : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा 3 शासन निर्णय डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!