महाराष्ट्रातील शाळांना गुणवत्ता, आरोग्य, स्वच्छता आणि प्रशासनाच्या बळावर स्पर्धात्मक बनवणारे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (CMMSSS) अभियान आता तिसऱ्या टप्प्यात (Tappa 3) दाखल झाले आहे.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सन २०२५-२६ करिता हे अभियान राबवण्यासाठी नुकताच शासन निर्णय (दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५) जारी केला आहे.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तालयाकडून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.
अभियानाचा इतिहास: विक्रमी सहभाग आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
या अभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या टप्प्यात (२०२३-२४) जवळपास ९५ टक्के शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता.
या मोठ्या यशामुळे अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली. दुसऱ्या टप्प्यात (२०२४-२५) देखील ९७ हजारांहून अधिक शाळांनी सहभाग घेतला आणि यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देऊन त्यांना तातडीच्या गरजांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3 ची उद्दिष्ट्ये:
तिसऱ्या टप्प्यात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3 ची प्रमुख उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- शैक्षणिक गुणवत्तेसह आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि क्रीडा या घटकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
- शालेय प्रशासनाचे बळकटीकरण करणे.
- शैक्षणिक संपादणूक (Academic Achievement) वाढीस प्रोत्साहन देणे.
वेळापत्रक आणि मूल्यांकन प्रक्रिया

Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3 अभियानाचा कालावधी ३ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असेल. अभियानाच्या पूर्वतयारीसाठी २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
मूल्यांकन प्रक्रिया अत्यंत कालमर्यादेत पूर्ण केली जाणार आहे.
- शाळा स्तरावर माहिती अंतिम करणे: १ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५.
- राज्य स्तरावरील अंतिम मूल्यांकन: २७ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६.
या अभियानाचे वेळापत्रक निश्चित असून, त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही. विशेष म्हणजे, शाळांकडून किंवा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल, त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.
याबद्दल सर्व संबंधित यंत्रणांनी अचूक नियोजन करून टप्पा-३ यशस्वीरित्या पार पाडण्याची दक्षता घेण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
गुणांकन निकष आणि स्पर्धेचे स्वरूप
या स्पर्धेतील शाळांना एकूण २०० गुणांवर आधारित गुणांकन दिले जाईल. हे गुण तीन प्रमुख निकषांमध्ये विभागले गेले आहेत:
- पायाभूत सुविधा (Infrastructure) – ३८ गुण.
- शासन ध्येय धोरण अंमलबजावणी (Implementation of Government Policies) – १०१ गुण.
- शैक्षणिक संपादणूक (Academic Achievement) – ६१ गुण.
Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala Tappa 3 या स्पर्धेमध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभागी होणे अपेक्षित आहे.
स्पर्धेसाठी शाळांची विभागणी दोन स्वतंत्र वर्गवाऱ्यांमध्ये करण्यात आली आहे.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा. त्यामुळे प्रत्येक स्तरावरील विजेते (तालुका ते राज्य) या दोन्ही वर्गवाऱ्यांमधून स्वतंत्रपणे निवडले जातील. यशस्वी शाळांना तालुका ते राज्य स्तरावर लाखो रुपयांची आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 PDF येथे डाउनलोड करा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 User Manual
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 रजिस्ट्रेशन नोंदणी डायरेक्ट लिंक



