मुख्यमंत्री सहायता निधी आता व्हॉट्सअ‍ॅपवर! हा लाभ मिळण्यास कोण पात्र आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती Mukhyamantri Sahayata Nidhi

By MarathiAlert Team

Published on:

Mukhyamantri Sahayata Nidhi राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळण्यास पात्र कोण आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Sahayata Nidhi

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळण्यास पात्र कोण आहेत?

मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती जसे पूर, चक्रीवादळ व भूकंप, मोठा अपघात आणि दंगली या वेळी बाधित झालेल्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वापरण्यात येते . या व्यतिरिक्त , मुख्यमंत्री सहाय्यता निधी सरकारी इस्पितळांचे प्राधिकृत येथे मुख्य रोग उपचार साठी अत्यंत गरिब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध आहे.

  • राज्यातील तसेच देशभरातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना मदत करणे.
  • जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना, जखमी झालेल्या लोकांना किंवा ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत करणे.
  • दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत करणे.
  • आजारी रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत करणे.
  • अपघातात मृत्यू झालेल्या (मोटार, रेल्वे, विमान किंवा जहाज अपघात वगळून) व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत करणे.
  • आर्थिक किंवा अन्य मदतीची गरज असलेल्या संस्थांना आवश्यक ती मदत करणे.
  • शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चर्चासत्रे किंवा संमेलने घेण्यासाठी मदत करणे.
  • शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटलसारख्या संस्थांच्या इमारती बांधण्यासाठी अंशतः आर्थिक किंवा इतर मदत करणे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी फॉर्म येथे डाउनलोड करा

Mukhyamantri Sahayata Nidhi Hospital List

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश

मुख्यमंत्री सहायता निधीसंदर्भात 23 एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आदीसह डॉक्टर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून निधी घ्यावा. यासाठी संस्था स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा. ही संस्था सीएसआर निधी मिळवून तो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नागरिकांच्या सेवेसाठी उपयोगात आणेल. ही संस्था मुख्यमंत्री सहायता निधी आणि सीएसआर यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करेल. मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रुग्णसेवेत येत असलेल्या अडचणींवर मात करीत रुग्ण सेवेसाठी निधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी रुग्णालयांची संलग्नता वाढवून जास्तीत जास्त रुग्णालये पॅनल करावी.

मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यापैकी रुग्णाला कुठल्या योजनेचे लाभ मिळेल, यापूर्वी घेतलेला लाभ, कुठल्या आजारावर किती लाभ मिळाला याबाबत सर्व माहिती पोर्टलवर असावी. गरजूला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी पारदर्शकता आणावी.

तालुकानिहाय रुग्णमित्र नियुक्त करावे. निधीबाबत सुधारित पोर्टल आणि टोल फ्री क्रमांक तयार करण्यात यावा. पोर्टलवर जियो टॅगिंग उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना ‘लोकेशन’ नुसार जवळचे रुग्णालय शोधत उपचारासाठी सहज दाखल होता येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात 31 मार्च 2025 पर्यंत 7 हजार 658 रुग्णांना 67 कोटी 62 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अशा प्रकारे आपण पाहिलं की, मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार असून, या निधीसाठी कोण पात्र आहे. अधिक माहितीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!