महाराष्ट्र सरकारने CM Fellowship Maharashtra 2025 26 या वर्षासाठी ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ जाहीर केला आहे. या योजनेद्वारे निवड होणाऱ्या 60 तरुणांना गट-अ अधिकाऱ्यांच्या दर्जाने एक वर्ष शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. फेलोशिपसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, मानधन व संपूर्ण माहिती खाली वाचा.
Table of Contents
उद्दिष्टे | CM Fellowship Maharashtra 2025 26
या योजनेचा उद्देश राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी देऊन त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव वाढवणे हा आहे.
- राज्यातील सुशिक्षित, जागरूक आणि तंत्रज्ञान-अनुकूल तरुणांना शासनाच्या धोरण प्रक्रियेत सहभागी करून घेणे.
- तरुणांच्या कल्पक विचारांना आणि नविन दृष्टिकोनाला प्रशासनात स्थान मिळवून देणे.
- युवांमध्ये नेतृत्वगुण, सार्वजनिक प्रशासनातील समज आणि निर्णयक्षमता निर्माण करणे.
- प्रशासनाच्या गती आणि परिणामकारकतेत सुधारणा करणे.
- ग्रामीण व शहरी भागात नवकल्पनांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे.
मुख्यमंत्री फेलोशिप साठी पात्रता काय आहे? | Eligibility
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण).
- अनुभव: किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव. इंटर्नशिप, अप्रेंटीसशिप किंवा स्वयंरोजगाराचाही अनुभव ग्राह्य धरला जाईल.
- भाषा कौशल्य: मराठी भाषेतील प्रावीण्य अनिवार्य. तसेच हिंदी व इंग्रजी भाषा समजणे आवश्यक.
- तांत्रिक ज्ञान: संगणक व इंटरनेटचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
- वयोमर्यादा: अर्जाच्या शेवटच्या तारखेस 21 ते 26 वर्षे दरम्यान वय असावे.
फेलोंची कामकाजाची रूपरेषा
- एकूण 60 फेलोंची निवड होणार.
- प्रत्येक जिल्ह्यात 2 ते 3 फेलोंना नेमण्यात येईल.
- फेलो एक वर्षासाठी जिल्हाधिकारी / जिल्हा परिषदेच्या अधीन कार्य करतील.
- कार्यकाल: 12 महिने (वाढीची संधी नाही).
- फेलो दर्जा: गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष.
CM fellowship Maharashtra Salary
- दरमहा ₹56,100/- मानधन.
- ₹5,400/- प्रवास भत्ता.
- एकूण ₹61,500/- प्रतिमाह स्टायपेंड (छात्रवृत्तीच्या स्वरूपात).
- शासकीय सेवा मानधारक म्हणून काही सवलतींचा लाभ.
शैक्षणिक भाग व प्रशिक्षण
- IIT मुंबईच्या सहकार्याने Public Policy या विषयावर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
- ऑफलाईन प्रशिक्षण: 3 टप्प्यांत IIT मुंबई येथे – प्रारंभी, 6 महिन्यानंतर, आणि शेवटी.
- वर्षभर ऑनलाईन व्याख्याने – शनिवारी/रविवारी.
- प्रशिक्षण पूर्ण करणे व उपस्थिती अनिवार्य आहे.
- यशस्वी फेलोंना प्रमाणपत्र दिले जाईल.
इतर महत्त्वाचे मुद्दे
- महिला फेलोंसाठी 1/3 आरक्षण.
- यापूर्वी फेलोशिप केलेले उमेदवार पुन्हा अर्ज करू शकत नाहीत.
- फील्डवर्क व शैक्षणिक कार्यक्रम दोन्ही पूर्ण करणे आवश्यक.
- ओळखपत्र (आधार इत्यादी) अनिवार्य.
- पात्रता निकषांचे काटेकोर पालन.
CM Fellowship Maharashtra 2025 Registration कसे अर्ज करावे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- उमेदवाराने mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
- अर्ज शुल्क: ₹500/- फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- निवड प्रक्रिया:
- Online Objective Test (वस्तुनिष्ठ परीक्षा)
- Online निबंध लेखन – ठराविक विषयांवर
- मुलाखत (Interview) – मुंबई येथे प्रत्यक्ष
- एकूण 210 जास्त गुण प्राप्त उमेदवार निबंधासाठी पात्र होतील व त्यातून अंतिम 60 उमेदवारांची निवड केली जाईल.
CM Fellowship Apply Online: https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
CM Fellowship Maharashtra Website : https://mahades.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम शासन निर्णय