Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra: महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ या वर्षासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाद्वारे राज्यातील तरुणांना शासकीय कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. नियोजन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे.
Table of Contents
मुख्यमंत्री फेलोशिप योजना – मुख्य उद्देश | Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 26 (CM Fellowship Yojana) जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश उच्चशिक्षित युवकांना प्रशासकीय व धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांना शासनाच्या विविध विभागांमध्ये संशोधन, धोरणे तयार करणे आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे महत्त्व
मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही केवळ एक शिष्यवृत्ती नसून, ती राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत सक्रिय सहभाग देणारी संधी आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रमुख सरकारी प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळते. यातून शासनाची धोरणे, विकास प्रकल्प, आणि सामाजिक सुधारणा यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: आता ११ महिन्यांपर्यंत प्रशिक्षण व ₹10,000 मानधन!
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची वैशिष्ट्ये
- राज्याच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत सहभाग
- विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्याची संधी
- थेट प्रशासकीय अधिकारी, मंत्री, व सरकारी तज्ज्ञ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
- संशोधन व विश्लेषण कौशल्य वाढविण्याची उत्तम संधी
- मासिक मानधन व अन्य लाभ
फेलोशिप अंतर्गत जबाबदाऱ्या
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना खालील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील –
🔹 शासनाच्या विविध प्रकल्पांवर संशोधन करणे
🔹 नवीन धोरणे तयार करण्यात मदत करणे
🔹 विभागीय प्रशासकीय कामकाज पाहणे
🔹 सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे
🔹 तंत्रज्ञान व नवोपक्रमाच्या साहाय्याने शासकीय कामकाज सुधारण्यात मदत करणे
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी पात्रता | Mukhyamantri Fellowship Yojana Eligibility
पात्रता निकष (Eligibility Criteria)
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावे.
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- कोणत्याही शाखेतील पदवीधर, किमान ६०% गुण आवश्यक.
- किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक. इंटर्नशिप/ अप्रेंटीसशिप / आर्टिकलशिपचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. स्वयंरोजगार किंवा स्वयंउद्योजगतेचा अनुभव ग्राह्य धरला जाईल, त्यासाठी स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे.
- मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक. हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
- संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक.
फेलोशिपसाठी मानधन आणि लाभ
निवडलेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- आणि प्रवासखर्च रुपये ५,४००/- मिळेल, म्हणजेच एकूण रुपये ६१,५००/- छात्रवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.
✅ मासिक मानधन: सुमारे 61,500 रुपये प्रतिमहिना (मानधन 56,100 व प्रवास खर्च 5,400 रुपये)
✅ प्रशासकीय प्रशिक्षण व नेतृत्व विकास कार्यशाळा
✅ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सरकारी परिषदांमध्ये सहभागाची संधी
✅ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव, भविष्यात सरकारी क्षेत्रात संधी वाढण्याची शक्यता
अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धती | Mukhyamantri Fellowship Yojana Apply Online
अर्ज प्रक्रिया (Application Process) : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करायचा आहे. अर्जासाठी शुल्क रुपये ५००/- आहे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (राज्य शासनाच्या mahades.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर) दिनांक 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Mukhyamantri Fellowship Yojana Apply Online : https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे आवश्यक.
- आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र अनिवार्य.
- ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Online Objective Test) द्यावी लागेल.
- वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना निबंध सादर करावा लागेल.
- मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.
अंतिम निवड (Final Selection) : अंतिम निवड वस्तुनिष्ठ चाचणी, निबंध आणि मुलाखतीतील गुणांवर आधारित असेल. एकूण ६० उमेदवारांची निवड होईल.
नियुक्ती आणि कालावधी (Appointment and Duration): निवड झालेल्या फेलोंची नियुक्ती १२ महिन्यांसाठी असेल. यात वाढ करण्यात येणार नाही.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेतून कोणाला फायदा होईल?
🎯 प्रशासन आणि सरकारी धोरणांमध्ये रस असलेल्या तरुणांना
🎯 संशोधन आणि धोरण विश्लेषण करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना
🎯 सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना
🎯 राजकीय व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 26 शासन निर्णय
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 26 साठी राज्यातील तरुणांना शासकीय कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. नियोजन विभागाने याबाबत दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय वाचा
अधिकृत वेबसाईट: https://mahades.maharashtra.gov.in/
निष्कर्ष
मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी उत्तम संधी आहे. शासनाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
👉 या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आजच अर्ज करा!