Nagarparishad Anukampa Niyukti GR महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने, दिवंगत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय ७ जुलै, २०२५ रोजी जारी केला आहे. हा निर्णय महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क या संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना लागू होईल.
Nagarparishad Anukampa Niyukti GR मुख्य तरतुदी
मुख्य तरतुदी:
नियुक्तीचा आधार: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी गट-क संवर्गातील असल्याने, त्यांच्या वारसांना सामान्य प्रशासन विभागाच्या प्रचलित तरतुदींनुसार अनुकंपा नियुक्ती दिली जाईल.
पदाचे स्वरूप: या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य संवर्गाव्यतिरिक्त नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील लिपिक पदावर नियुक्ती देण्यात येईल.
वेतनश्रेणी: या लिपिक पदाची वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार ५२००-२०२०० ग्रेड वेतन १९०० (सातव्या वेतन आयोगानुसार S-६, रु. १९९००-६३२००) असेल.
कार्यपद्धती: अनुकंपा तत्वावर लिपिक पदावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभागाच्या २६ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने निश्चित करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्राथमिक जबाबदारी: दिवंगत राज्यस्तरीय संवर्ग अधिकारी यांच्या वारसांना शासन सेवेत नियुक्ती देण्याची प्राथमिक जबाबदारी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांची आहे.
यापूर्वी, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते की, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य संवर्गातील गट-क, श्रेणी-क मधील सातव्या वेतन आयोगानुसार S-१३-३५४००-११२४००, S-१०-२९२००-९२३०० या निम्नश्रेणीमधील पदावर नियुक्ती द्यावी किंवा नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या आस्थापनेवर राज्य संवर्गाव्यतिरिक्त लिपिक किंवा तत्सम पदांवर नियुक्ती द्यावी. या प्रस्तावावर आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्राय विचारात घेऊन हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा