महाराष्ट्रातील तरुणांसाठी आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई/महाराष्ट्र अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) या कंत्राटी पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण १९७४ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाचा ऑनलाईन अर्ज करणे करता नोटिफिकेशन आणि लिंक बाबत सूचना जारी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भरती तपशील | NHM Recruitment 2025 Maharashtra
- पदाचे नाव: समुदाय आरोग्य अधिकारी
- एकूण रिक्त जागा : 1974
रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे

शैक्षणिक पात्रता
या महत्त्वाकांक्षी NHM Recruitment 2025 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे:
आयुर्वेद (BAMS) , युनानी (BUMS), बी.एस्सी. नर्सिंग, किंवा बी.एस्सी. इन कम्युनिटी हेल्थ. संबंधित पदवीधारकांकडे इंटर्नशिप पूर्ण केल्याचे आणि NMC/MCIM किंवा नर्सिंग कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याचा कालावधी: इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. १८/११/२०२५ ते दि. ०४/१२/२०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाइन अर्जाची लिंक: अर्ज करण्यासाठीची लिंक https://ibpsreg.ibps.in/nhmoct25/ ही दि. १८/११/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजल्यानंतर कार्यान्वित होईल.
अर्ज शुल्क: अर्ज शुल्क नॉन-रिफंडेबल (परत न मिळणारे) असेल आणि ते ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पदाचा ऑनलाईन अर्ज करणे करता नोटिफिकेशन आणि लिंक बाबत येथे पाहा
परीक्षा स्वरूप
निवड प्रक्रिया ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षेद्वारे होईल. ही परीक्षा १०० गुणांची, १०० प्रश्नांची (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) असेल आणि त्यासाठी १२० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. या परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुण (Negative Marking) पद्धत लागू नाही.
उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. १०००/- असून, मागास प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी रु. ९००/- आहे.
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी पगार
प्रशिक्षण दरम्यान: प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६ महिन्यांच्या प्रमाणपत्र प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड (Stipend) दिले जाईल.
नियुक्तीनंतर: आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रावर नियुक्ती झाल्यावर उमेदवारांना दरमहा रु. २५,०००/- वेतन आणि रु. १५,०००/- कामावर आधारित प्रोत्साहन मोबदला (PBI) देय राहील.
राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात काम करणाऱ्यांना रु. १५,०००/- चा अतिरिक्त प्रोत्साहन मोबदला देखील दिला जाईल.
या NHM Recruitment 2025 अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला पुढील ३ वर्षांसाठी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासन सेवा देणे बंधनकारक असेल.
यासाठी प्रशिक्षणाला रुजू होण्यापूर्वी रक्कम रु. १,०३,०००/- चा बाँड (Bond) सादर करणे अनिवार्य आहे.भरती प्रक्रियेतील कोणत्याही बदलांची किंवा नवीन माहितीची नोंद उमेदवारांनी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी घ्यावी. भरती प्रक्रियेशी संबंधित इतर कोणत्याही माध्यमाद्वारे माहिती उपलब्ध होणार नाही, याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी : राष्ट्रीय आरोग्य अभियान सविस्तर पीडीएफ जाहिरात पाहा
प्रवेशपत्र (Call Letter) आणि परीक्षेसंबंधी माहिती
प्रवेशपत्र डाउनलोड: ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र/हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक परीक्षेच्या १० दिवस आधी https://nhm.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल.
प्रवेशपत्रासाठी आवश्यक तपशील: नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख.
परीक्षेला उपस्थिती: उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उशिरा आलेल्या उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही.परीक्षेचा कालावधी: परीक्षा १२० मिनिटांची (२ तास) असली तरी, आवश्यक औपचारिकता (कागदपत्रे तपासणे, लॉगिन, सूचना) पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना अंदाजे ४ तास परीक्षा केंद्रावर थांबावे लागू शकते.


















