जुनी पेन्शन योजनेचा ‘एक वेळ पर्याय’ ठरला यशस्वी; जाणून घ्या कोणाला मिळाला हा लाभ! Old Pension Scheme Latest Update

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension Scheme Latest Update राज्य शासनाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अशाच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे, ज्यांची पदभरतीची जाहिरात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी प्रकाशित झाली होती पण नियुक्ती त्यानंतर झाली अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Old Pension Scheme Latest Update

काय आहे प्रकरण?

दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वरिष्ठ लिपिक म्हणून श्री. सचिन बोरसे, हे कार्यरत आहेत , यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ नंतर झाली होती, परंतु त्यांच्या पदभरतीची जाहिरात या तारखेपूर्वी प्रकाशित झाली होती. त्यामुळे, वित्त विभागाने दिलेल्या ‘एक वेळ पर्याया’नुसार (One Time Option) त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन आदेशातील प्रमुख मुद्दे:

  • श्री. बोरसे यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अर्ज १३ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यापीठाला प्राप्त झाला होता.
  • त्यांची पहिली नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात २१ जून २००६ रोजी लिपिक पदावर झाली होती.
  • त्यानंतर ५ एप्रिल २००७ पासून ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रुजू झाले.
  • त्यांची उच्च न्यायालयातील सेवा विद्यापीठातील सेवेसोबत फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या (Gratuity) उद्देशाने जोडली गेली आहे.
  • या आदेशानुसार, श्री. बोरसे यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) खाते बंद केले जाईल.
  • NPS खात्यातील त्यांच्या योगदानाची रक्कम देय व्याजासह त्यांच्या नवीन उघडल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (GPF) खात्यात जमा केली जाईल.
  • NPS खात्यातील शासनाच्या वाट्याची रक्कम राज्याच्या एकत्रित निधीत वर्ग करण्यात येईल.

हा शासन आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने १८ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. वित्त विभागाने ८ जुलै २०२५ रोजी दिलेल्या अभिप्रायानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक पात्र कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होण्याबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय वाचा

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!