Pensioner E Ppo Digilocker Process: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. वित्त विभाग महराष्ट्र राज्य शासन निर्णय दिनांक ३ ऑक्टोबर नुसार, आता निवृत्तीवेतन प्रदान आदेश (e-PPO), उपदान प्रदान आदेश (e-GPO), आणि अंशराशीकरण प्रदान आदेश (e-CPO) हे सर्व दस्तऐवज DigiLocker सुविधेमध्ये उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे निवृत्तीवेतन व इतर संबंधित लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि तत्पर होणार आहे.
Pensioner E Ppo Digilocker Process संपूर्ण माहिती
माहिती व तंत्रज्ञानाचा वापर:
शासकीय कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार , भारत सरकारने सुरू केलेल्या ‘Digital India‘ उपक्रमांतर्गत ‘DigiLocker‘ ही सेवा निवृत्तीवेतन धारकांसाठी वापरली जाणार आहे. या निर्णयामुळे दस्तऐवज हरवणे, खराब होणे , किंवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश उशीराने प्राप्त होणे या अडचणी दूर होतील.
निर्णयाची अंमलबजावणी:
- सेवा संलग्न (Linked) करण्याची तारीख: दि.०६.१०.२०२५.
- समाविष्ट प्रकरणे: महालेखापाल कार्यालय (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई व नागपूर यांचेकडून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना पूर्वी निर्गमित करण्यात आलेली आणि भविष्यात मंजूर करण्यात येणारी सर्व निवृत्तीवेतन प्रकरणे.
- ‘निवृत्तीवेतनवाहिनी’ प्रणाली: संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि महालेखापाल कार्यालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘निवृत्तीवेतनवाहिनी’ प्रणालीसोबत निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे DigiLocker खाते संलग्न (Linked) करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रणाली निवृत्तीवेतन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते प्रदान करण्यापर्यंत ‘एकल खिडकी आज्ञावली’ म्हणून कार्य करते.
DigiLocker मध्ये दस्तऐवज मिळवण्याची सोपी कार्यपध्दती
निवृत्तीवेतनधारकांनी e-PPO, e-GPO, e-CPO प्रदान आदेश DigiLocker मध्ये उपलब्ध होण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरायची आहे (“परिशिष्ट-१” मध्ये नमूद केल्यानुसार):

- DigiLocker खाते उघडणे: मोबाईल फोनमध्ये DigiLocker App डाउनलोड करावे किंवा www.digilocker.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाच्या आधारे ‘Sign Up’ करून खाते उघडावे किंवा लॉगिन करावे.
- विभाग शोधणे: DigiLocker मध्ये ‘Issued Documents’ किंवा ‘Search Documents’ पर्यायामध्ये जाऊन Maharashtra State पर्याय निवडून “Directorate of Accounts and Treasuries” शोधावे.
- माहिती भरणे: महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेला निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक (e-PPO) व कोषागार कार्यालयाचे नाव ही माहिती भरून “Get Document” वर क्लिक करावे.
- दस्तऐवज उपलब्ध: e-PPO, e-GPO, e-CPO प्रदान आदेश स्वयंचलितरीत्या DigiLocker खात्यात उपलब्ध होतील आणि PDF स्वरूपात डाउनलोड करता येतील.
- मदत कक्ष: अधिक माहितीपत्रक निवृत्तीवेतनवाहिनी पोर्टलवर https://pension.mahakosh.gov.in/login.jsp या संकेतस्थळावरील User Manual >> Pension >> User Manual DigiLocker येथे उपलब्ध आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



