Pik Vima Status Maharashtra 2025: नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १०० दिवसांच्या कृती आराखड्यात याचा समावेश करण्यात आला असून, यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेत पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम ३१ मार्चपूर्वी वितरित केली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान दिली.
Table of Contents
शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याचा निर्णय
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पीक विमा नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सदस्य राजेश विटेकर यांनी लक्षवेधी मांडली होती. या चर्चेत सदस्य राहुल पाटील व सई डहाके यांनीही सहभाग घेतला. मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले की, राज्य शासन शेती व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ७.६३ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, ५.२३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील एकूण पीक पेरलेल्या क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी करत बाधित शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १७३४.२६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर
खरीप २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यासाठी ४२६.५५ कोटी रुपये आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १७३४.२६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत परभणी जिल्ह्यात ४.१० लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले असून, त्यासाठी ४७३.४४ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ४१७.१२ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. मराठवाड्यातील ३३.९७ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे ३०६७.५२ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, २४५८.६२ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी २१९७.१५ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.
Pik Vima Status Maharashtra 2025 – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) 2025 अंतर्गत नुकसानीच्या भरपाईसाठी निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली आहे.
Pik Vima Status 2025 – मुख्य मुद्दे
✔ नुकसान भरपाई वाटप: सरकारकडून 2025 मध्ये मंजूर केलेली नुकसानभरपाई ३१ मार्चपर्यंत वितरित केली जाणार.
✔ अग्रिम भरपाई: शेतकऱ्यांना २५% अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय.
✔ विमा मंजुरी: महाराष्ट्रात 2025 साठी 2200 कोटींपेक्षा जास्त नुकसानभरपाई मंजूर.
✔ मराठवाडा आणि विदर्भावर विशेष लक्ष: या भागांत जास्त नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना वेगाने मदत दिली जात आहे.
✔ ऑनलाइन स्टेटस तपासा: शेतकरी पीक विमा भरपाई स्टेटस ऑनलाइन पाहू शकतात.
शेतकरी बांधवांनो, तुमचे ‘अॅग्रीस्टॅक’ ओळखपत्र मिळवा आणि सरकारी योजनांचा थेट लाभ घ्या!
पीक विमा स्टेटस 2025 ऑनलाइन कसे तपासावे? Pik Vima Status Check Online
तुमच्या पीक विम्याची स्थिती (Pik Vima Status Check Online) जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
1️⃣ प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिकृत वेबसाइटवर जा:
👉 https://pmfby.gov.in/
2️⃣ “Application Status” वर क्लिक करा.

3️⃣ तुमचा नोंदणी क्रमांक (Policy ID) क्रमांक टाका आणि तपासा.
4️⃣ क्लेम स्टेटस दिसेल: तुमच्या भरपाईच्या मंजुरीविषयीची माहिती मिळेल.
Insurance Premium Calculator
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) 2025 अंतर्गत विमा प्रीमियम किती भरावा लागेल, हे ऑनलाइन कळू शकते. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज पीक विमा प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता.
- अधिकृत वेबसाइटवर जा: https://pmfby.gov.in/
- “Premium Calculator” पर्याय निवडा.
- तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि पीक निवडा.
- पीक हंगाम (खरीप / रब्बी) निवडा आणि विमा रक्कम प्रविष्ट करा.
- “Calculate Premium” वर क्लिक करा.
- तुमच्या पिकासाठी लागू होणारा विमा प्रीमियम दिसेल.

Insurance Premium Calculator Check Here
पीएम PM किसान लाभार्थी यादीत नाव येथे चेक करा – डायरेक्ट लिंक
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स
🔹 विमा कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू आहे.
🔹 ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी नियमितपणे स्टेटस तपासावे.
🔹 नुकसान झाल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा बँकेशी संपर्क साधा.
📝 अधिक माहितीसाठी:
📞 PMFBY हेल्पलाइन: 1800-180-1111 / 1800-120-1472
🌐 कृषी विभाग महाराष्ट्र: https://krishi.maharashtra.gov.in
🚜 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सतत अपडेट राहा! ✅