Samaj Kalyan Vibhag Bharti: सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यात 4 मार्च 2025 पासून 19 मार्च 2025 पर्यंत 56 परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात सुरळीत परीक्षा सुरू झाली असून उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
Table of Contents
परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
✅ परीक्षा वेळेवर द्या! – काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी दिलेल्या वेळेच्या किमान १ तास आधी केंद्रावर पोहोचावे.
✅ दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना – अर्जात नमूद केल्याप्रमाणे दिव्यांग उमेदवारांनी स्वतःचा लेखनिक स्वतः उपलब्ध करून घ्यावा. विभागाकडून लेखनिक पुरवला जाणार नाही.
✅ प्रवेशपत्र डाउनलोड करा – सर्व पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. डाउनलोड करा: https://sjsa.maharashtra.gov.in
✅ काय आणावे? – फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मूळ पुरावा आणि त्याची छायांकित प्रत सोबत असावी.
✅ परीक्षा 3 सत्रांमध्ये घेतली जात आहे – दररोज सुमारे 22,000 उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.
भव्य करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा – संधीचं सोनं करा!
प्रवेशपत्र कसे मिळवावे? Samaj Kalyan Vibhag Bharti Admit Card
✅ उमेदवारांना 25 फेब्रुवारी 2025 पासून प्रवेशपत्र (SJSA Bharti Admit Card 2025) ऑनलाइन उपलब्ध झाले आहे.
✅ SJSA Bharti Admit Card https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
✅ अधिकृत संकेतस्थळ: https://sjsa.maharashtra.gov.in
✅ प्रवेशपत्रामध्ये महत्त्वाच्या सूचनांसह परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्ध.
भरतीसाठी अर्जांचा आकडा
📌 एकूण अर्जदार: 1,87,202 उमेदवार
👩🎓 महिला उमेदवार: 99,508
👨🎓 पुरुष उमेदवार: 87,658
🎖 माजी सैनिक उमेदवार: 3,448
GDS Result Merit List 2025: निवड यादी जाहीर! त्वरित यादीत नाव चेक करा
विविध पदांसाठी अर्जसंख्या Samaj Kalyan Vibhag Bharti
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (5 जागा): 11,216 अर्ज
- गृहपाल/अधीक्षक (61 जागा): 40,968 अर्ज
- गृहपाल/अधीक्षक (महिला – 92 जागा): 73,625 अर्ज
- समाज कल्याण निरीक्षक (39 जागा): 58,009 अर्ज
- उच्च श्रेणी लघुलेखक (10 जागा): 1,317 अर्ज
- निम्म श्रेणी लघुलेखक (3 जागा): 620 अर्ज
- लघु टंकलेखक (9 जागा): 1,447 अर्ज
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
समाज कल्याण विभाग भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर Samaj Kalyan Vibhag Time Table
- परीक्षेची तारीख: ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५.
- परीक्षेचा प्रकार: ऑनलाईन, संगणकावर आधारित, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी.
पदांची नावे
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
- गृहपाल / अधिक्षक (महिला)
- गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण)
- समाज कल्याण निरीक्षक
- उच्चश्रेणी लघुलेखक
- निम्न श्रेणी लघुलेखक
- लघुटंकलेखक
समग्र शिक्षा अंतर्गत विविध पदांची भरती
सविस्तर वेळापत्रक
- ४-६ मार्च २०२५: गृहपाल / अधिक्षक (महिला) विविध सत्रांमध्ये.
- ७ मार्च २०२५: गृहपाल / अधिक्षक (महिला) सकाळचे सत्र, आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक दुपार आणि संध्याकाळचे सत्र.
- १०-११ मार्च २०२५: गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) विविध सत्रांमध्ये, ११ तारखेला संध्याकाळी उच्चश्रेणी लघुलेखक.
- १२ मार्च २०२५: समाज कल्याण निरीक्षक सकाळचे सत्र, लघुटंकलेखक दुपारचे सत्र आणि निम्न श्रेणी लघुलेखक संध्याकाळचे सत्र.
- १७-१९ मार्च २०२५: समाज कल्याण निरीक्षक प्रत्येक दिवशी विविध सत्रांमध्ये.
संपूर्ण वेळापत्रक पीडीएफ येथे डाउनलोड करा
प्रत्येक दिवशी ३ सत्रे
- सत्र १: सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत
- सत्र २: दुपारी १.०० ते ३.०० वाजेपर्यंत
- सत्र ३: संध्याकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत.
सतर्कतेसाठी महत्वाचे निर्देश
भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. गैरमार्गाने नोकरी मिळवण्याच्या भूलथापांना बळी पडू नये.
कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
📢 ✅ अधिकृत माहितीसाठी भेट द्या:
🔗 https://sjsa.maharashtra.gov.in
🛑 परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचा आणि परीक्षेसाठी योग्य ती तयारी ठेवा!
🚀 सर्व उमेदवारांना शुभेच्छा! 🎯