School Admission Age Limit 2026 : शाळा प्रवेशाच्या इयत्ता पहिली आणि प्ले ग्रुप साठी बालकाचे वय नेमके किती असावे? याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यानुसार सध्या राज्यातील RTE Admission Age Limit बाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर पाहूया..
Table of Contents
शाळा प्रवेशासाठी 31 डिसेंबरला असलेले वय गृहीत धरणार
राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते.
तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.
आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित; या मानवी दिनांकावर ठरणार वयोमार्यादा
सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार ३१ जुलै हा मानिव दिनांक गृहीत धारण्याबाबत निर्णय दिलेला आहे. बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) (प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : आरटीई 25 टक्के प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु, ऑनलाईन अर्ज येथे करा
इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे, तर प्ले ग्रुपसाठी तीन वर्षांची अट
School Admission Age Limit : दिनांक सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

सदर आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा








