RTE 25% Admission 2026: 3 किमीपर्यंत शाळा निवडण्याची मुभा, मुदतवाढ जाहीर

Published On: March 25, 2026
Follow Us
rte admission school selection new rule

सन 2026-27 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत पालकांसाठी मोठा दिलासा देणारे 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता शाळा निवडण्यासाठी 1 अंतराची अट शिथिल करण्यात आली असून, आता 3 किमी पर्यंतच्या शाळा निवड करता येणार आहे. तसा बदल RTE Admission पोर्टल ऑनलाईन फॉर्म भरताना पर्याय देण्यात आला आहे. तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च पर्यंत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.

यामुळे अनेक पालकांना अधिक पर्याय मिळणार असून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी वाढली आहे.

1 किमीऐवजी आता 3 किमीपर्यंत शाळा निवडता येणार

यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी पालकांना त्यांच्या घरापासून 1 किमी अंतरातील शाळा निवडण्याची मर्यादा होती. मात्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर हा नियम शिथिल करण्यात आला आहे.

rte admission school selection new rule

आता जर जवळपास (1 किमीमध्ये) शाळा उपलब्ध नसेल, तर पालकांना 3 किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा देखील निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

या बदलामुळे ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी अर्ज केलेल्यांसाठी मोठी अपडेट

ज्या पालकांनी 16 मार्च 2026 पर्यंत अर्ज भरले आहेत, त्यांना आता अर्जामध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे.

ऑनलाईन पोर्टलवर अर्ज Unconfirm करण्याची सुविधा देण्यात आली असून आता पुन्हा बदल करून Confirm करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना नवीन नियमांनुसार शाळा निवडता येणार आहेत.

RTE अर्जाची अंतिम तारीख वाढवली

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आधी 18 मार्च 2026 होती.

आता ही मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

म्हणून ज्या पालकांनी अजून अर्ज भरलेला नाही त्यांनी या मुदतीत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेत केलेले हे बदल पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहेत. 3 किमीपर्यंत शाळा निवडण्याची मुभा आणि अर्जासाठी वाढवलेली मुदत यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.

म्हणून ज्या पालकांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांनी 25 मार्च 2026 पूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच आधी अर्ज केलेल्यांनी नवीन नियमांनुसार शाळांची निवड करून अर्ज पुन्हा तपासून Confirm करावा.

अधिक माहितीसाठी : https://student.maharashtra.gov.in/

rte admission school selection new rule
rte admission school selection new rule

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment