Shikshak Bharti Second Phase Checking महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. यामध्ये शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाच्या पडताळणीवर भर देण्यात आला आहे.
Shikshak Bharti Second Phase Checking
युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनानंतर आणि पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या सूचनांनुसार , २१ मे २०२५ रोजी मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या संदर्भात, २७ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) साठी १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिरातीपूर्वी, उमेदवारांना १० मार्च २०२५ पासून त्यांच्या सामाजिक प्रवर्गात आवश्यक बदल करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी यापूर्वी ‘ओपन’ किंवा ‘EWS’ प्रवर्गातून अर्ज केले होते, त्यांना २७ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार SEBC आरक्षण लागू होत असल्यास, त्यांनी त्यात बदल करणे अपेक्षित होते.
परंतु, काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गात आवश्यक बदल न केल्यामुळे, त्यांची शिफारस ‘EWS’ प्रवर्गातून झाली आहे. यामुळे, कागदपत्र पडताळणीदरम्यान EWS प्रवर्गातून शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या EWS प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या उमेदवाराला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना, त्याने चुकून ‘EWS’ प्रवर्गातून अर्ज केला असेल, तर अशा उमेदवाराच्या पात्रतेबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात यावा.
याबाबत महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई) आणि नगरपालिका/नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांनाही (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या) याची माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी: परिपत्रक येथे पाहा