Pavitra Portal Phase 2 Merit List Released महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षण सेवक/शिक्षक पदांच्या भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल‘ या संगणकीय प्रणालीद्वारे आयोजित “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” च्या दुसऱ्या टप्प्यातील पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात मुलाखतीशिवाय 1,588 रिक्त पदांसाठी tait2022.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Pavitra Portal Phase 2 Merit List Released
परीक्षेची पार्श्वभूमी: “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार परीक्षेला बसले होते. या चाचणीतील गुणांच्या आधारे इयत्ता १ ली ते १२ वी आणि अध्यापक विद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरतीचा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत, २५ फेब्रुवारी २०२४, २५ जून २०२४, ३० जुलै २०२४ आणि ७ ऑगस्ट २०२४ रोजी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन्ही प्रकारांमध्ये २१,६७८ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया: शासन पत्र १० सप्टेंबर २०२४ नुसार, आता “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत शिक्षक निवडीची कार्यवाही सुरू झाली आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांकडून रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
10,321 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध | Pavitra Portal Phase 2 Merit List Released
रिक्त पदांचा तपशील (दुसरा टप्पा – मुलाखतीशिवाय): या टप्प्यात एकूण १५८८ रिक्त पदांसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये:
- १८ जिल्हा परिषदांच्या ४६८ जागा
- १३ महानगरपालिकांच्या ३६२ जागा
- ५७ नगरपालिका/परिषदांच्या २२१ जागा
- २५ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ५३७ जागा
याव्यतिरिक्त, मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्ये ८,७३३ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे.
पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे आणि शिफारस झालेल्या उमेदवारांचा तपशील (मुलाखतीशिवाय):
१) आरक्षणनिहाय रिक्त पदे:
- एकूण १५८६ पदे रिक्त आहेत.
- अनुसूचित जाती: १८२
- अनुसूचित जमाती: १३१
- विमुक्त जाती (अ): ४६
- भटक्या जमाती (ब): २७
- भटक्या जमाती (क): ४५
- भटक्या जमाती (ड): ३१
- विशेष मागास प्रवर्ग: २२
- इतर मागास प्रवर्ग: २१७
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: १३७
- सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग: १८९
- खुला प्रवर्ग: ५५९
२) आरक्षणनिहाय शिफारस झालेले उमेदवार:
- एकूण १११४ उमेदवारांची शिफारस झाली आहे.
- अनुसूचित जाती: १३५
- अनुसूचित जमाती: ६४
- विमुक्त जाती (अ): ३७
- भटक्या जमाती (ब): २६
- भटक्या जमाती (क): २२
- भटक्या जमाती (ड): १४
- विशेष मागास प्रवर्ग: ०६
- इतर मागास प्रवर्ग: १६८
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: १०७
- सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग: १३३
- खुला प्रवर्ग: ४०२
३) गटनिहाय रिक्त पदे:
- इयत्ता १ ते ५ वी: ८९२
- इयत्ता ६ ते ८ वी: ३२२
- इयत्ता ९ ते १० वी: २२०
- इयत्ता ११ ते १२ वी: १५४
- एकूण: १५८८ पदे
४) गटनिहाय शिफारस झालेले उमेदवार:
- इयत्ता १ ते ५ वी: ५५४
- इयत्ता ६ ते ८ वी: २१०
- इयत्ता ९ ते १० वी: २१६
- इयत्ता ११ ते १२ वी: १३४
- एकूण: १११४ उमेदवार
५) माध्यमनिहाय रिक्त पदे:
- मराठी: १२५१
- उर्दू: २५८
- हिंदी: ५३
- तामिळ: २
- बंगाली: २३
- तेलुगू: १
- एकूण: १५८८ पदे
६) माध्यमनिहाय शिफारस झालेले उमेदवार:
- मराठी: ९६३
- उर्दू: १००
- हिंदी: ३५
- बंगाली: १६
- एकूण: १११४ उमेदवार
महत्वाच्या तारखा:
- उमेदवारांना ११ मार्च २०२५ ते २१ मार्च २०२५ आणि १० एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत स्वप्रमाणपत्र पूर्ण/दुरुस्त करण्याची सुविधा देण्यात आली होती.
- २५ एप्रिल २०२५ ते २ मे २०२५ आणि ६ मे २०२५ ते ८ मे २०२५ या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा होती.
पुढील प्रक्रिया: आज, २१ मे २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानंतर, मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध केली जाईल.
या पदभरतीसंदर्भात उमेदवारांना काही म्हणणे किंवा मागणी असल्यास, त्यांनी edupavitra२०२२@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, जेणेकरून त्याची योग्य दखल घेतली जाईल.
Pavitra Portal Phase 2 Merit List Released : पवित्र पोर्टल शिक्षक भरती गुणवत्ता याद्या येथे डाउनलोड करा- डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/