TAIT Exam Date 2025 महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र (PAVITRA) संगणकीय प्रणालीद्वारे घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT 2025) ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा आता 27 ते 30 मे 2025 आणि 2 ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
लवकरच या परीक्षेची TAIT Mock Test Online Free परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. सदर परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५ प्रसिध्दी निवेदन परीक्षा परिषदेने जारी केले आहे.
TAIT Exam संपूर्ण माहिती
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५ प्रसिध्दी निवेदन (Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT) – 2025)
महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ ऐवजी दि. १४/०५/२०२५ करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत दि. १४/०५/२०२५ रोजी २३.५९ मि. पर्यंत आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत युट्युब चॅनेल्स, सोशल मिडीया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमाद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
TAIT Exam Date 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयकडून दिनांक २१/०३/२०२५ च्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन (TAIT Exam Date 2025) माहे मे व जून २०२५ मध्ये करत असलेबाबत अवगत करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
TAIT Exam Date 2025 : टेट परीक्षा दिनांक 27 ते 30 मे 2025 आणि 2 ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट व्यतीरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे/उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही. तरी विद्यार्थ्यांनी/उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कार्यवाही करावी.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.mscepune.in/
