MAHA TAIT 2025 Notification जाहीर: MSCE Pune द्वारे ऑनलाईन अर्ज सुरू | शिक्षक भरतीसाठी पात्रता चाचणीची संपूर्ण माहिती व तारखा पाहा!

Published On: May 7, 2025
Follow Us
MAHA TAIT 2025 Notification

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी MAHA TAIT 2025 ची अधिसूचना (MSCE Pune) मार्फत जाहीर करण्यात आली आहे. आता उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया.

MAHA TAIT 2025 Application Form Date

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती साठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT Exam 2025) या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दिनांक 26 एप्रिल ते 14 मे 2025 या कालावधीत मागविण्यात येत आहे.

maha tet 2025 application form date

या परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उपलब्ध पदसंख्या

राज्यातील शिक्षण सेवकांच्या, शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व व बिंदुनामावली नुसार ‘पवित्र‘ (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट देत राहावी.

MAHA TAIT 2025 Syllabus

परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम

परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) या वरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी – मराठी अथवा इंग्रजी – उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील.

अभ्यासक्रम

सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परिक्षेसाठी निवडलेल्या पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.

MAHA TAIT Syllabus
  • अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्त्व इत्यादी उपघटक राहतील.
  • बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षाही विषयज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तरमर्यादा असणार नाही.

परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा (१२० मिनिटे) कालावधी राहील.

MAHA TAIT 2025 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी – महत्वाच्या लिंक

MSCE Pune Official Website : https://www.mscepune.in/

MAHA TAIT 2025 Registration : https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

शिक्षक भरती पवित्र पोर्टल : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025
BMC Peon Recruitment

मुंबई उच्च न्यायालयात 887 पदांसाठी मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध

December 10, 2025

Leave a Comment