Maharashtra Teacher Recruitment: पवित्र पोर्टलद्वारे राज्यात १८,८०० शिक्षकांची भरती! शिक्षणमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती, भरती प्रक्रिया, वयोमर्यादा आणि इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या.
Table of Contents
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १८ हजार ८०० शिक्षकांची भरती Maharashtra Teacher Recruitment
पवित्र पोर्टल प्रणाली लागू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत 18,800 शिक्षकांची पदभरती करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेतील चर्चेदरम्यान सदस्य किशोर दराडे यांनी शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदभरतीबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तरदेताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.
सन 2011 मध्ये पटसंख्येतील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षक भरतीवर बंदी घातली होती. मात्र, विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांसाठी विशेष मोहिम राबवून 2016 मध्ये ही बंदी उठवण्यात आली. त्यानंतर 2017 मध्ये “पवित्र पोर्टल“ (Pavitra Portal) सुरू करण्यात आले.
मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की प्राथमिक शिक्षक भरतीसाठी कमाल वयोमर्यादा आहे, मात्र माध्यमिक शाळांसाठी अशी कोणतीही अट नाही. शिक्षक भरतीसाठी संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत 10,940 रिक्त पदांची मागणी पवित्र पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. यातील 80% पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय, शिपाई पद कायमस्वरूपी भरता येणार नाही, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
RTE लॉटरी प्रवेश यादी जाहीर! तुमच्या मुलाचे नाव आहे का? त्वरित तपासा!
महत्त्वाचे मुद्दे
- 18,800 शिक्षक भरती पूर्ण
- 2016 मध्ये भरतीवरील बंदी उठली
- 2017 पासून पवित्र पोर्टल प्रणाली लागू
- 10,940 रिक्त पदांची नोंद, 80% मंजूर
- माध्यमिक शिक्षकांसाठी कमाल वयोमर्यादा नाही
शिक्षक आणि शाळांसाठी मोठी बातमी! वाढीव टप्पा अनुदान व संच मान्यता अपडेट!
राज्यातील शिक्षक भरती (Maharashtra Teacher Recruitment) प्रक्रियेला वेग देण्यासाठी प्रशासन सक्रिय असून, भविष्यात अधिक पदे भरण्याची शक्यता आहे.
आदिवासी आश्रमशाळांसाठी मोठा निर्णय! शिक्षक भरतीबाबत महत्वाचे निर्देश
शाळांचा दर्जावाढ आणि नवीन मंजुरीबाबत शासन सकारात्मक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
राज्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी दर्जावाढ आणि इयत्ता १ ली ते १२ वीच्या नवीन मंजुरीसंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
MSEDCL मध्ये बंपर भरती! सविस्तर तपशील वाचा
शाळांच्या मंजुरीबाबत महत्त्वाची माहिती
विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान सदस्य जयंत असगावकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी शाळांच्या मंजुरी प्रक्रियेबाबत माहिती दिली.
✅ शाळांच्या शुल्क आकारणीवर चर्चा गरजेची
मंत्री भुसे यांनी सांगितले की, शाळांकडून घेतले जाणारे शुल्क आणि पालकांवर येणारा आर्थिक भार यावर चर्चा होणे आवश्यक आहे. जसे शाळांच्या मान्यतेसाठी निकष ठरवले जातात, तसेच शुल्क धोरणावरही स्पष्ट चर्चा व्हावी.
राज्यातील मान्यताप्राप्त शाळांची स्थिती:
📌 राज्य मंडळ शाळा: 13,664
📌 CBSE शाळा: 1,204
📌 राज्य मंडळ व CBSE संलग्न शाळा: 15
📌 एकूण शाळा: 15,261
महात्मा फुले आरोग्य योजनेत नवे अपडेट – आता मिळणार अधिक सुविधा!
ऑनलाईन व ऑफलाइन प्रस्तावांची संख्या:
📌 दर्जावाढसाठी ऑनलाईन प्रस्ताव: 134
📌 नवीन शाळांसाठी ऑनलाईन प्रस्ताव: 81
📌 ऑफलाइन प्रस्ताव: 127
राज्यातील शाळांची मंजुरी प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा विचार सुरू असल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि नव्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.