Tappa Anudan Sanch Manyata Update: राज्यातील वेतन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या विषयावर सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
त्यांनी स्पष्ट केले की, टप्पा अनुदानाच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात, विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी शासन निर्णयानुसार अंशतः अनुदानित शाळांना २०% वाढीव टप्पा (Tappa Anudan) देण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
संच मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात!
मंत्री भुसे यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी संच मान्यता (Sanch Manyata) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि काही तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पात या विभागासाठी सर्वाधिक निधी मंजूर
दुर्दैवी घटनेबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन
दिवंगत शिक्षक नागरगोजे यांच्या संदर्भातही मंत्री भुसे यांनी सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. नागरगोजे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेतील शिक्षक होते.
मोठी बातमी! राज्यातील या शिक्षकांना ‘2’ आगाऊ वेतनवाढी मंजूर, शासन निर्णय जाहीर
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार!
टप्पा अनुदानाच्या अंमलबजावणीसाठी सरकार गांभीर्याने विचार करत असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून योग्य तोडगा काढला जाईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
या चर्चेत विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, अभिजीत वंजारी, विक्रम काळे, धीरज लिंगाडे आणि किशोर दराडे यांनी सहभाग नोंदवला.