मार्च महिन्याच्या वेतनात DA वाढीसह फरक मिळणार, आदेश जारी

Published On: April 7, 2026
Follow Us
da-arrears-march-2026

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षण संचालनालयाने माहे मार्च २०२६ चे वेतन महागाई भत्ता फरकासह (DA Arrears) अदा करण्याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि वेतन पथक अधीक्षकांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या निर्णयानुसार, राज्य सरकारने १ जुलै २०२५ पासून महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा केली होती. या सुधारित दरानुसार जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारात मोठी वाढ होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी २०२६ चे वेतन देयके शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच कोषागारात सादर करण्यात आली होती, अशा जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांबाबतही स्पष्टता देण्यात आली आहे. अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी २०२६ या एका महिन्याचा देय महागाई भत्ता फरक देखील मार्च २०२६ च्या वेतनासोबतच रोखीने दिला जाणार आहे.

DA Calculator : महागाई भत्ता वाढ पगार चेक करा

शासनाने यापूर्वीच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय उपलब्ध करून दिला होता. आता शिक्षण संचालनालयाने दिलेल्या या ताज्या आदेशामुळे मार्च महिन्याचे वेतन हे महागाई भत्त्याच्या फरकासह वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून, प्रशासकीय स्तरावर यासाठी तातडीने देयके तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

DA Arrears

7th Pay Commission

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment