राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती नियम लागू! कामाच्या ठिकाणी महिलांना मिळणार अधिक संरक्षण Women Safety Vishakha Committee

By MarathiAlert Team

Updated on:

Women Safety Vishakha Committee: राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता खासगी आस्थापनांसाठीही ही समिती बंधनकारक करण्याचे नियोजन सुरू असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, अनेक खासगी आस्थापनांमध्ये अद्याप विशाखा समिती स्थापन झालेली नाही. याची तपासणी करून विविध स्तरांवर त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असून, महिलांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी कार्यवाही अधिक गतीने केली जाईल.

गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे मानधन वाढ अपडेट

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर

राज्यात विशाखा समित्या स्थापन Women Safety Vishakha Committee

राज्य शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली असून, विविध आस्थापनांमध्ये तक्रार निवारण समित्या तसेच जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या राज्यात ७४,०१० विशाखा समित्या स्थापन झाल्या आहेत, तसेच १० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी ३६ जिल्हास्तरीय तक्रार समित्या कार्यरत आहेत.

महिला व बालविकास आयुक्तालयाला राज्य समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, जिल्हा, महानगरपालिका, नगरपालिका आणि तालुका स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

HSRP प्लेट: आता जुन्या वाहनांसाठी पण आवश्यक! नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

महिलांना SHE BOX ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येईल. राज्य सरकार वेळोवेळी बैठका आणि परिपत्रकांच्या माध्यमातून या समित्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

मोठी बातमी! राज्यातील या शिक्षकांना ‘2’ आगाऊ वेतनवाढी मंजूर, शासन निर्णय जाहीर

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!