Two Advance Salary Hikes For Teachers: महाराष्ट्र शासनाने राज्य आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, विशिष्ट कालावधीतील पुरस्कार विजेत्या शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी (Two Advance Increments) मंजूर करण्यात आली आहे.
Table of Contents
शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर Two Advance Salary Hikes For Teachers
महाराष्ट्र राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सकारात्मक पाऊल उचलले असून पात्र शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर (Salary Hikes) करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर २००५ ते २०१३ दरम्यान पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना वेतनवाढ न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१४ मध्ये शासनाने वेतनवाढीऐवजी एक लाख रुपये प्रोत्साहन म्हणून मंजूर केले. मात्र, २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देत शासनाला वेतनवाढ लागू करण्याचे आदेश दिले.
मोठी बातमी! वाढीव टप्पा अनुदान व संच मान्यता बाबत महत्वाची अपडेट!
महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०१४ पूर्वी राज्य आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ३५ शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी! किमान वेतनात मोठी वाढ
या जिल्ह्यांतील शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा मिळणार लाभ!
या निर्णयामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, धुळे, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती आदी जिल्ह्यांतील शिक्षकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. शासनाने हा निर्णय लागू करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत.
नवीन पेन्शन योजना: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! पर्याय निवडण्याची शेवटची संधी!
शासन निर्णयाचे महत्त्वाचे मुद्दे:
- पुरस्कारप्राप्त ३५ शिक्षकांना दोन वेतनवाढी मिळणार.
- याआधी एक लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली होती, ती वजा केली जाणार.
- फक्त पात्र ३५ शिक्षकांनाच हा लाभ लागू होणार, इतरांना नाही.
- वेतनवाढीमुळे शिक्षकांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार.
गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे मानधन वाढ अपडेट
राज्यातील पात्र शिक्षक– यादी व शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 17 मार्च 2025 रोजी पात्र शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याचा शासन निर्णय व यादी जाहीर केली आहे.
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय व शिक्षक यादी पाहा
राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी; बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत शासन निर्णय