Pension Scheme Maharashtra Update: राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ!

By MarathiAlert Team

Updated on:

Pension Scheme Maharashtra Update: राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (National Pension System) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (New Pension Scheme) तसेच केंद्र सरकारची ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना‘ (Unified Pension Scheme) या दोन योजनांपैकी एका योजनेचा पर्याय निवडण्याची संधी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने आता दिनांक 26 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension Scheme Maharashtra Update

🔹 सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना राज्य शासनाने १ मार्च २०२४ पासून लागू केली आहे.
🔹 केंद्र शासनाची ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना (#UPS) २४ ऑगस्ट २०२४ रोजी घोषित झाली असून, ती लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
🔹 #NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना या दोन्ही योजनांमधून कोणतीही एक योजना निवडण्याचा पर्याय दिला आहे.

NPS vs UPS: कोणती पेन्शन योजना तुमच्या भविष्यासाठी BEST आहे? सविस्तर जाणून घ्या

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ!

सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होण्यासाठी: ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता यासाठी 26 मार्च 202६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
✅ जर नंतर ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (UPS) निवडायची असेल, तर #UPS संदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर होण्याच्या पहिल्या तारखेपर्यंत एकदाच बदल करण्याची संधी असेल.

Pension Scheme Maharashtra LAST DATE
Pension Scheme Maharashtra New Update

राज्यातील कंत्राटी, रोजंदारी, करार कर्मचाऱ्यांची किमान वेतन वाढ! मसुदा येथे पाहा

सुधारित: राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (NPS)

राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तिवेतन योजना (#UPS) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चला, या सुधारीत योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांकडे एक नजर टाकूया!

सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये

गुंतवणुकीवरील जोखीम: राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणुकीवरील जोखीम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तिवेतन मिळणार असून, महागाई भत्ताही लागू राहील.

नवीन योजना लागू होण्याची तारीख: १ मार्च २०२४ पासून सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना #NPS अंमलात येणार आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ: ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच निवृत्ती घेतली आहे व वार्षिकी (Annuity) खरेदी केली आहे, त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपासून २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचेच लाभ लागू राहतील. मात्र, १ मार्च २०२४ नंतर ते सुधारीत योजनेचा पर्याय निवडू शकतात.

सेवा कालावधीची गणना: सेवेत असताना भरलेल्या अंशदानाच्या (वर्गणीच्या) आधारे सेवा कालावधी ठरवला जाईल. जर काही कालावधीसाठी अंशदान भरले नसल्यास, तो कालावधी सेवा गणनेत धरला जाणार नाही.

फंडवरील निर्बंध: सुधारीत योजनेचा स्वीकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संचित निधीमधून कोणत्याही कारणासाठी रक्कम काढता येणार नाही. तसेच, यापूर्वी काढलेली रक्कम १०% व्याजासह शासनाकडे जमा करावी लागेल.

HSRP प्लेट: आता जुन्या वाहनांसाठी पण आवश्यक! नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

निवृत्तिवेतनाचे प्रमाण:

  • २० वर्षे किंवा अधिक सेवा झालेल्यास: शेवटच्या वेतनाच्या ५०% निवृत्तिवेतन मिळणार.
  • १०-२० वर्षे सेवा झाल्यास: सेवाकालाच्या प्रमाणात निवृत्तिवेतन अनुज्ञेय.
  • १० वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास: निवृत्तिवेतन लागू होणार नाही.
  • किमान निवृत्तिवेतन: ७,५००/- रुपये प्रतिमाह.

राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी: अशा कर्मचाऱ्यांना फक्त राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे लाभच लागू राहतील.

अन्य कर्मचाऱ्यांसाठी: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पात्र कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू राहील, परंतु त्यासाठी शासन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करेल.

महत्त्वाची नोंद

  • या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांनी NPS मधील त्यांचे अंशदान अद्यावत भरलेले असणे आवश्यक आहे.
  • सेवानिवृत्तीनंतर ६०% परताव्याची रक्कम शासनाकडे जमा करणे बंधनकारक असेल.
  • उर्वरित ४०% रक्कम Annuity Service Provider कडून शासनाला प्राप्त झाल्यावर निवृत्तिवेतन मंजूर होईल.

ही सुधारीत योजना कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता प्रदान करणार असून, भविष्यातील निवृत्तिवेतन व्यवस्थापन अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

ℹ️ अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी:

  • राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत. शासन निर्णय वाचा
  • शिक्षण संचालनालयाचे पत्र वाचा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती जाहिरात पाहा

निष्कर्ष

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली #NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने सुधारित निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र शासनाची एकात्मिक निवृत्ती योजना (UPS) सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना या दोनपैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्याची मुभा आहे. राज्य शासनाच्या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 26 मार्च 2026 पर्यंत विकल्प सादर करणे आवश्यक आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये या लेखात दिली असून, त्यानुसार तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.

nps ups maharashtra letter
NPS UPS Maharashtra Letter

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!