आदिवासी आश्रमशाळांसाठी मोठा निर्णय! शिक्षक भरतीबाबत महत्वाचे निर्देश Ashramshala Teacher Bharti News

By MarathiAlert Team

Updated on:

Ashramshala Teacher Bharti News: आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील संचमान्यता करून नोकर भरती सुरू करण्याच्या अनुषंगाने सविस्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्री उईके यांच्यासोबत संस्थाचालकांनी बैठक घेतली. या बैठकीत आमदार संजय पुरम, बाळासाहेब मांगुडकर, माजी आमदार अपूर्व हिरे, वैभव पिचड, आनंद ठाकूर, शिवराम झोले, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अनुदानित आश्रमशाळांच्या समस्यांवर चर्चा

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना देण्यात येणारे अनुदान विद्यार्थी संख्येनुसार देण्यात यावे. अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पुन्हा सुरू करावी.

टप्प्या टप्प्याने देण्यात येणारे अनुदान वेळेत देण्यात यावे. संच मान्यता असलेल्या व पदे मंजूर असलेल्या ठिकाणी शिक्षकांना मान्यता मिळावी, अशा विविध मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.

शिक्षक आणि शाळांसाठी मोठी बातमी! वाढीव टप्पा अनुदान व संच मान्यता अपडेट!

शिक्षक भरतीसंदर्भात विभागाने तपासणी करून अहवाल सादर करावा

आदिवासी विकास मंत्री उईके म्हणाले की, आदिवासी विकास विभाग आणि अनुदानित आश्रमशाळा हे एक कुटुंब आहे. या दोघांनी एकत्र येऊन आदिवासी आश्रम शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.

अनुदानित आदिवासी आश्रम शाळा (Tribal School) या दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. हे विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावे, यासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत.

खुशखबर! लाडकी बहीण योजनेतून मिळणार 25 हजार पर्यंतचे कर्ज!

Ashramshala Teacher शिक्षक भरतीसंदर्भात विभागाने तपासणी करून अहवाल सादर करावा. आकस्मिक खर्चाचे अनुदानाचे टप्पे वेळेत देण्यात यावेत. संस्थाचालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील. संस्था चालकांना न्याय देऊ, असेही मंत्री उईके यांनी सांगितले. अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमधील संच मान्यता करून शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, अनुदानाचे टप्पे वेळेत द्यावेत आदी मागण्यांचे निवेदन संस्थाचालकांनी यावेळी सादर केले.

MHT CET Hall Ticket 2025: परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध! हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!