MHT CET Hall Ticket 2025: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (cetcell.mahacet.org) विविध 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. बहुतांश अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, MHT CET MAH-MBA/MMS CET A.Y. 2025-26, (MHT CET 2025 Admit Card Released PCB Group) परीक्षेचे Admit Card जारी करण्यात आले आहे.
Table of Contents
13 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
सर्वप्रथम MAH-M.Ed. CET आणि MAH-M.P.Ed. अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होईल, तर शेवटच्या टप्प्यात एमएचटी सीईटीची परीक्षा (MHT CET 2025 Exam) आयोजित केली जाईल. राज्यभरातून एकूण १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. MHT CET परीक्षांचे Hall Ticket 2025 जारी करण्यात आले आहे.
राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केली आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक ७ लाख ६५ हजार ३३८ अर्ज दाखल झाले आहेत, तर सर्वात कमी अर्ज एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमासाठी आले आहेत.
MHT CET 2025 Exam Start from 19 March
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एम.एड आणि एम.पी.एड अभ्यासक्रमांसाठी MHT CET 2025 Exam 19 मार्चपासून प्रवेश परीक्षा सुरू होत आहे. १९ अभ्यासक्रमांपैकी बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम यांसाठी अद्याप अर्ज नोंदणी सुरू आहे, तर विधी अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अर्ज नोंदणी विद्यार्थ्यांची संख्या
- एम.एड परीक्षा – ३,८०९ विद्यार्थी
- एम.पी.एड परीक्षा – २,३८४ विद्यार्थी
- एमएचटी-सीईटी – ७,६५,३३८ विद्यार्थी
एमएचटी सीईटी परीक्षा वेळापत्रक
परीक्षेचे नाव | परीक्षेची तारीख |
---|---|
MAH-M.P.Ed-CET 2025 | 19 मार्च 2025 |
MAH-MCA CET 2025 | 23 मार्च 2025 |
MAH-MBA/MMS-CET 2025 | 1 ते 3 एप्रिल 2025 |
MAH-MHT CET (PCB) | 9 ते 17 एप्रिल 2025 |
MAH-MHT CET (PCM) | 19 ते 27 एप्रिल 2025 |
विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या तारखेनुसार तयारी करावी. अधिक माहितीसाठी
राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी १९ मार्चपासून प्रवेश परीक्षा सुरू होत असून, विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार तयारी करावी. अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
MHT CET Hall Ticket 2025
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) कडून 19 मार्च पासून सुरू होणाऱ्या परीक्षांचे MAH-MHT CET 2025 परीक्षेसाठी हॉल तिकीट (MHT CET Hall Ticket 2025) जारी करण्यात आले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे?
1️⃣ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – https://cetcell.mahacet.org/
2️⃣ “MHT CET 2025 Hall Ticket” लिंकवर क्लिक करा
3️⃣ लॉगिनसाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका
4️⃣ हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंट काढा
MAH BEd MCA CET Admit Card Live 2025 – Download Direct Link
MAH CET Admit Card 2025 Download Direct Link
Admit Card is live for MAH-MBA/MMS CET A.Y. 2025-26. Kindly Download.
Admit Card is live for MAH-MCA CET A.Y. 2025-26. Kindly Download
Admit Card is live for MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT- CET A.Y. 2025-26. Kindly Download
Admit Card is live for MAH-M.Ed. & MAH-M.P.Ed. CET A.Y. 2025-26. Kindly Download
महत्वाच्या सूचना
📌 परीक्षा केंद्रावर जाताना प्रिंटेड हॉल तिकीट आणि ओळखपत्र (ID Proof) बाळगणे आवश्यक आहे.
📌 वेळेआधी परीक्षा केंद्रावर हजर राहा.
📌 अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे अपडेट तपासा.
✍ MAH-MHT CET 2025 परीक्षेसाठी शुभेच्छा! 🎯
👍