Maha CET Notice 2025: महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) कडून महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना cetcell.mahacet.org संकेतस्थळावर जाहीर केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Cet Cell Exam Notice जारी करण्यात आली आहे.
Table of Contents
महत्वाचे! सामायिक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना!
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला (State Common Entrance Examination Cell) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या विविध सामायिक प्रवेश परीक्षा, विशेषतः एमबीए/एमएमएस आणि अभियांत्रिकी सीईटी परीक्षांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून बनावट कॉल करून विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल वाढवण्याचे आमिष दाखवले जात होते. या तक्रारींची दखल घेत, तात्काळ एफआयआर दाखल करण्यात आला असून योग्य कारवाई करत संबंधितांना अटक करण्यात आली आहे.
सर्व संबंधित सामायिक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा आणि अशा कोणत्याही फसव्या योजनांना बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी. असे सीईटी सेलकडून कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेले परिपत्रक वाचा
मागील वर्षांचे ट्रेंड नुसार, बोर्ड परीक्षा निकाल या तारखेला जाहीर होणार

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा एमएचटी सीईटी जाहीर सूचना
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी घेण्यात येणाऱ्या महा BCA/BBA/BMS/BBM/ MBA, MCA (Integrated) CET 2025 परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदतवाढ (RegistrationFinal Date Extension) देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अद्याप अर्ज भरलेला नाही किंवा ज्यांनी अर्ज भरला आहे परंतु परीक्षा शुल्क भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २५ डिसेंबर २०२४
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद होण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी २०२५
- प्रथम टप्प्यात परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: २१ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५
- अंतिम टप्प्यात परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: २१ मार्च २०२५ ते २८ मार्च २०२५
Maha CET Notice 2025
इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी की, ही अंतिम मुदतवाढ आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाइट https://cetcell.mahacet.org/ वर उपलब्ध आहे.
त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि २८ मार्च २०२५ पूर्वी आपला अर्ज निश्चितपणे सादर करावा.

MAH CET Exam Date 2025
महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. MAH-B.BBA/BCA/BBM/BMS/MBA (Integrated) /MCA Integrated CET 2025 परीक्षा दिनांक 29 व 30 एप्रिल, 2 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण वेळापत्रक पाहा
अधिक माहितीसाठी आणि नियमित अपडेट्ससाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहा.