महात्मा फुले आरोग्य योजनेत नवे अपडेट – आता मिळणार अधिक सुविधा! Mahatma Phule Jan Arogya Yojana Update

By MarathiAlert Team

Updated on:

Mahatma Phule Jan Arogya Yojana Update: राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या जाणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानपरिषद सदस्य इद्रिस नाईकवाडी यांनी Mahatma Phule Jan Arogya योजनेच्या अंमलबजावणीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

योजनेतील सुधारणा: Mahatma Phule Jan Arogya Yojana Update

दरपत्रक सुधारणा: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत यांचे एकत्रीकरण झाले असले तरी काही दरपत्रकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात येईल, ज्यामध्ये डॉक्टर, अधिकारी आणि अन्य संबंधित घटकांचा समावेश असेल.

डॉक्टर भरती: मागील काही महिन्यांमध्ये ४०० एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, एप्रिलनंतर आणखी भरती केली जाणार आहे.

१०८ रुग्णवाहिका सेवा: राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेतील जुन्या वाहनांच्या जागी १७५० नवीन वाहनांची भर टाकण्यात येणार आहे. ही वाहने महामार्ग, रेल्वे स्थानके आणि महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली जातील.

रुग्ण तक्रारींवर कारवाई: अनेक खासगी रुग्णालये शासनाच्या जागेचा व सुविधांचा वापर करूनही समाधानकारक सेवा देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधी व न्याय विभाग आणि आरोग्य विभागाची संयुक्त समिती कठोर उपाययोजना राबवणार आहे.

मॉनिटरिंग यंत्रणा: महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णालयांना होणाऱ्या बिल देयकास विलंब होऊ नये, यासाठी वित्त विभागासोबत समन्वय साधला जाणार आहे.

जन आरोग्य योजनेत 1356 आजारांवर विनामूल्य उपचार! तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पाहा

शासनाने गरजू नागरिकांसाठी अनेक योजना लागू केल्या असून, त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. तसेच, योजनेत आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, याचा आढावा घेण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षक आणि शाळांसाठी मोठी बातमी! वाढीव टप्पा अनुदान व संच मान्यता अपडेट! 

या चर्चेत विधान परिषद सदस्य भाई जगताप, श्रीमती उमा खापरे, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, अमित गोरखे, श्रीमती चित्रा वाघ, सदाभाऊ खोत, सुनील शिंदे, विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला.

सरकारचा मोठा निर्णय! जन्म-मृत्यू नोंदणीसंबंधी नवे नियम जाहीर

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!