दहावी परीक्षा गडबड? प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीचे सत्य उघड! SSC Exam Latest New

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Exam Latest New : दिनांक 21 फेब्रुवारी पासून इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा (SSC Exam 2025) सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी सोशल मिडियावर पेपर फुटीच्या बातम्या व्हायरल झाल्यात, आता खुद्द महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा

काय घडले? SSC Exam Latest New

  1. 21 फेब्रुवारी 2025 पासून राज्यभर दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.
  2. काही वृत्तवाहिन्यांनी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात मराठी प्रथम भाषा प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
  3. शिक्षण मंडळाच्या चौकशीनुसार या बातम्यांमध्ये तथ्य नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी खोट्या माहितीचा गैरवापर केला आहे.

10 वी व 12 वी विद्यार्थ्यांना सवलत गुण मिळवण्याची संधी! या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार 

शिक्षण मंडळाचा अहवाल

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर (केंद्र क्र. 3050):

  • तपासणीअंती फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट झाले.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेली पाने मूळ प्रश्नपत्रिका नसून, खाजगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली नोट्स किंवा हस्तलिखित उत्तरपत्रिका होती.
  • जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, दोषींवर कारवाई होणार आहे.

10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

राज्यातील विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि कोठारी परीक्षा केंद्रे

  • येथेही कोणतीही प्रश्नपत्रिका फुटी झालेली नाही.
  • काही गैरप्रवृत्तीच्या लोकांनी परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षक भरती अपडेट: दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात 

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशाला, तळणी (केंद्र क्र. 3436):

  • परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
  • मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि परीक्षा सुरळीत पार पडली.

शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा संदेश

  • विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
  • फक्त अधिकृत माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) तपासा.
  • सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

अधिक महतीसाठी : प्रकटन वाचा

Mahahsscboard Hall Ticket 2025

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी जाहीर, ऑनलाईन नोंदणी डायरेक्ट लिंक

SSC Exam

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!