TAIT Exam Result 2025 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 च्या निकालासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक (प्रेस नोट) जारी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, TAIT 2025 परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा २७ ते ३० मे २०२५ आणि ०२ ते ०५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार परीक्षेला बसले होते.
TAIT Exam Result 2025
शासनाच्या ०२ मे २०२५ च्या शुद्धीपत्रकानुसार, उमेदवारांना त्यांच्या व्यावसायिक अर्हतेचे (बी.एड./डी.एल.एड.) गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून जास्तीत जास्त १ महिन्याच्या आत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, विविध संस्थांचे निकाल वेगवेगळ्या वेळी जाहीर होत असल्याने, आणि डी.एल.एड. चा निकाल ०५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाल्यामुळे , TAIT 2025 परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यास आणि एकत्रित करण्यास वेळ लागत आहे.
त्यामुळे उमेदवारांनी युट्युब चॅनेल आणि सोशल मीडियावरील बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. उमेदवारांनी वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सूचना आणि माहिती तपासत राहावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असतील, असेही परिषदेने स्पष्ट केले आहे.
सध्या “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” च्या निकालाची प्रक्रिया सुरू आहे आणि तो लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट : https://www.mscepune.in/
हे प्रसिद्धीपत्रक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जारी करण्यात आले आहे.
