Teacher Transport Allowance : अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना आता मिळणार वाहतूक भत्ता! शासन निर्णय जाहीर
Table of Contents
राज्यातील सुमारे २१६ शिक्षकांना लाभ मिळणार
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सुमारे २१६ दिव्यांग विशेष शिक्षकांना लाभ मिळणार आहे. (Contract Employees Transport Allowance)
कोणाला मिळणार लाभ? Teacher Transport Allowance
केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा, अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या खालील दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे.
- जिल्हा समन्वयक – ०६
- विशेष तज्ञ/समावेशित शिक्षक – ५२
- विशेष शिक्षक – १५८
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ! ५६४३ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार – फरकाची रक्कम चेक करा
किती मिळणार वाहतूक भत्ता?
- ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीसाठी एकूण ४४,०३,७००/- रुपये निधी मंजूर.
- प्रत्येक दिव्यांग कर्मचाऱ्याला त्यांच्या पदाला अनुज्ञेय वाहतूक भत्ता मिळणार.
केंद्र सरकारच्या नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन
महत्वाचे मुद्दे
- हा निर्णय दिव्यांग विशेष शिक्षकांना मोठा दिलासा देणारा आहे.
- यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
- शिक्षण क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सेवानिवृत्तीनंतरही मुलींना मिळणार पेन्शन!
Teacher Transport Allowance GR
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी Transport Allowance शासन निर्णय जारी केला आहे.
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय पाहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता अखेर मिळणार!