YCMOU अभ्यासक्रमाचे गृहपाठ ऑनलाईन सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

By MarathiAlert Team

Published on:

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी YCMOU Assignment ऑनलाईन अपलोड करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. परीक्षा विभागाने १५ डिसेंबर २०२५ रोजी परिपत्रक क्र. ६३ द्वारे ही घोषणा केली आहे. 

यापूर्वी, हस्तलिखित गृहपाठ (Home Assignment) विद्यापीठाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ होती. तथापि, विद्यार्थी, अभ्यासकेंद्र (Learner Support Centre) आणि समंत्रक (Evaluator) यांना दिलासा देत, खालीलप्रमाणे नवीन मुदतवाढ देण्यात आली आहे. 

YCMOU गृहपाठ ऑनलाईन सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

  • YCMOU Assignment विद्यार्थ्यांनी अपलोड करणे : २५ डिसेंबर २०२५
  • विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या गृहपाठांची अभ्यासकेंद्रांनी पडताळणी करणे : २८ डिसेंबर २०२५
  • समंत्रकांनी गृहपाठ तपासणी करणे : ३१ डिसेंबर २०२५

विद्यार्थ्यांनी दिलेल्या वाढीव मुदतीमध्ये आपला YCMOU Assignment अपलोड करणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी या मुदतीत गृहपाठ अपलोड करणार नाहीत, त्यांना त्या विषयामध्ये ‘गैरहजर’ (Absent) दर्शविण्यात येईल आणि त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे, सर्व अभ्यासकेंद्रांनीही विहित मुदतीत समंत्रकांकडून विद्यार्थ्यांचे गृहपाठ तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस अभ्यासकेंद्र जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

YCMOU Assignment अपलोड करण्यासाठी लिंक

गृहपाठ पोर्टल लिंक (Home Assignment Portal Link): https://asm.ycmou.org.in/

YCMOU Home Assignment गृहपाठ ऑनलाईन सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

मदत क्रमांक (Helpline No): ८०७११८६७८९, ८०५५२५३०७२, ८००७२५३०४४
या मुदतवाढीचा फायदा घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत आपले YCMOU Assignment पूर्ण करून अपलोड करावेत आणि संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळावे.

अधिक माहितीसाठी : संपूर्ण मार्गदर्शिका येथे डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!