11th Admission First List Declared राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आणि विविध कोटा प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी शुक्रवार, २८ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
11th Admission First List Declared
प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया आणि मुदत: विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी शनिवार, ३० जून २०२४ पासून ते सोमवार, ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या लॉगिनमध्ये जाऊन ‘Proceed for Admission‘ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या फेरीची माहिती: पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी मंगळवार, ०८ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित केली जाईल.
11th Admission First List Download
- Allotment List Kindly enter your Application number to find your allotment details
Application Number
Allotment List Download - Cut-off List > Select District > Select Stream Code – कट-ऑफ लिस्ट (Cut-off List) Download
- Vacancy List Region > Select District > Select Stream Code – Vacancy List Download
महत्वाची संपर्क माहिती:
- प्रवेश प्रक्रियेचे पोर्टल: mahafyjcadmissions.in
- ई-मेल आयडी: support@mahafyjcadmissions.in
- हेल्पलाईन नंबर: ०२२०४९५५५४४
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील डॉ. महेश पालकर यांनी याबाबत माहिती दिली असून, सर्व संबंधित प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.
