महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने Scholarship Examination (शिष्यवृत्ती परीक्षा) मध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार, हे बदल शैक्षणिक वर्ष Academic Year 2025-26 पासून लागू होणार आहेत.
PUP PSS MSCE Scholarship संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षांच्या संरचनेत (Structure) मोठे बदल केले आहेत.
१७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार, यापुढे पूर्वीची इयत्ता ५ वीची परीक्षा रद्द करून ती इयत्ता ४ थी स्तरावर ‘प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (Primary Scholarship Examination) म्हणून, तर इयत्ता ८ वीची परीक्षा रद्द करून ती इयत्ता ७ वी स्तरावर ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (Upper Primary Scholarship Examination) म्हणून आयोजित केली जाईल.
हे बदल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार असून, सन २०२६-२७ पासून ही परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यात नियमितपणे घेतली जाईल. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची पात्रता (Eligibility Criteria) ठरवताना, १ जून रोजी त्यांचे कमाल वय ४ थी साठी १० वर्षे (दिव्यांग: १४ वर्षे) आणि ७ वी साठी १३ वर्षे (दिव्यांग: १७ वर्षे) निश्चित करण्यात आले आहे.
या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन (Evaluation) दोन पेपरद्वारे केले जाईल—प्रत्येक पेपर १५० गुणांचा, एकूण ३०० गुणांचा असेल. पेपर १ मध्ये प्रथम भाषा आणि गणित (Maths), तर पेपर २ मध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी (Intelligence) हे विषय समाविष्ट आहेत.
सर्व प्रश्न Objective आणि Multiple Choice स्वरूपाचे असतील. सर्वात महत्त्वाचा पात्रता निकष (Qualifying Criteria) म्हणजे, शिष्यवृत्तीसाठी निवड होण्याकरिता प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील ३ वर्षांसाठी ४ थी स्तरावर दरमहा रु. ५००/- आणि ७ वी स्तरावर दरमहा रु. ७५०/- अशी शिष्यवृत्ती रक्कम (Scholarship Amount) थेट त्यांच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्यात (DBT) जमा केली जाईल, ज्यामुळे आर्थिक पाठबळ (Financial Support) मिळेल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षेची सवय लागेल, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक Performance आणि भविष्यातील स्पर्धांसाठीची तयारी सुधारेल.
परीक्षेच्या स्तरातील आणि नावातील बदल
पूर्वीची परीक्षा (Previous Exam)
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी).
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी).
नवीन परीक्षा (New Exam) आणि नामाभिधान
- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Primary Scholarship Examination): ही परीक्षा आता इयत्ता ४ थी साठी घेतली जाईल.
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Upper Primary Scholarship Examination): ही परीक्षा आता इयत्ता ७ वी साठी घेतली जाईल.
अंमलबजावणी (Implementation): हे बदल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होतील.परीक्षेची वेळ: सन २०२६-२७ पासून इयत्ता ४ थी आणि ७ वीची परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाईल.
पात्रता निकष (Eligibility Criteria) आणि वयोमर्यादा
पात्रता (Eligibility): विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि तो शासनमान्य शाळेत (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित) इयत्ता ४ थी किंवा ७ वी मध्ये शिकत असावा.
वयोमर्यादा (Age Limit – १ जून रोजी):
- प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ४ थी): सर्वसाधारण प्रवर्ग – १० वर्षे आणि दिव्यांग प्रवर्ग – १४ वर्षे.
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ७ वी): सर्वसाधारण प्रवर्ग – १३ वर्षे आणि दिव्यांग प्रवर्ग – १७ वर्षे.
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) आणि गुण
- प्रश्न स्वरूप: सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (Objective) आणि बहुपर्यायी (Multiple Choice) असतील.
- काठिण्य पातळी: कठीण (३०%), मध्यम (४०%), सोपे (३०%).
- एकूण गुण: परीक्षा ३०० गुणांची असेल (प्रत्येक पेपर १५० गुण).वेळ: दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी १ तास ३० मिनिटे (एकूण ३ तास).
| पेपर | विषय | प्रश्न संख्या | गुण |
| पेपर १ | प्रथम भाषा (First Language) | २५ | ५० |
| गणित (Maths) | ५० | १०० | |
| एकूण | ७५ | १५० | |
| पेपर २ | तृतीय भाषा (Third Language) | २५ | ५० |
| बुद्धिमत्ता चाचणी (Intelligence) | ५० | १०० | |
| एकूण | ७५ | १५० |
अभ्यासक्रम (Syllabus)
- इयत्ता ४ थी (Primary Level): इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचा अभ्यासक्रम.
- इयत्ता ७ वी (Upper Primary Level): इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम.पात्रता निकष (Qualifying Criteria): शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण (Minimum 40% Marks) मिळवणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम आणि कालावधी
| परीक्षा | मंजूर शिष्यवृत्ती रक्कम (प्रतिमाह) | वार्षिक रक्कम | कालावधी |
| इयत्ता ४ थी (Primary) | रु. ५००/- | रु. ५,०००/- | ३ वर्षांसाठी |
| इयत्ता ७ वी (Upper Primary) | रु. ७५०/- | रु. ७,५००/- | ३ वर्षांसाठी |
वितरण: ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्यात (Aadhaar Linked Joint Bank Account) थेट (Direct Benefit Transfer – DBT) वितरित केली जाईल.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा | https://2025.puppssmsce.in/





